सेवानिवृत्त गटविकास अधिकारी काशिनाथ रापतवार यांचे निधन
अंबाजोगाई (वसुदेव शिंदे):- अंबाजोगाई येथील सेवा निवृत्त गट विकास अधिकारी काशिनाथ रापतवार वय ८५ यांचे अल्पशा आजाराने शुक्रवार दि २१ रोजी दुःखद निधन झाले आहे. त्यांच्यावर दासोपंत परिसर येथिल स्मशानभूमीतदुपारी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. आपल्या सेवकाळात ते एक मनमिळाऊ पण शिस्तप्रिय अधिकारी म्हणून परिचित होते.
त्यांच्या पश्चात्य तीन मुले, दोन मुली, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर ज्यामध्ये राजकीय, सामाजिक , सांस्कृतिक ,शैक्षणिक तसेच पत्रकारिता क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. काशिनाथ रापतवार हे जेष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार यांचे काका तर शिक्षक मैत्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय रापतवार यांचे वडील होते. यावेळी श्रद्धांजली अर्पण करतांना अनेक मान्यवरांनी आपल्या शोक संवेदना व्यक्त केल्या.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा