ना.पंकजाताई मुंडे यांनी मानले केंद्र व राज्य सरकारचे आभार
श्री क्षेञ मच्छिंद्रनाथ गड ते कानिफनाथ गड रोप-वे ला शासनाची मंजुरी
ना.पंकजाताई मुंडे यांनी मानले केंद्र व राज्य सरकारचे आभार
रोप-वे मुळे बीड-नगर जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला मिळणार चालना
बीड ।दिनांक २७।
आष्टी तालुक्यातील श्री क्षेञ मच्छिंद्रनाथगड (मायंबा) ते पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेञ कानिफनाथगड (मढी) या दरम्यान ३.६ कि.मीच्या रोप-वे प्रकल्पाला राज्य सरकारने मान्यता देवून नाथ भक्तांना सुविधा उपलब्ध करुन दिल्याबद्दल राज्याच्या पर्यावरण,वातावरणीय बदल व पशूसंवर्धन मंञी ना.पंकजाताई मुंडे यांनी राज्य व केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.
या दोन्ही गडा दरम्यान रोप-वे सुरू करावा यासाठी पाथर्डीचे आमदार मोनिका राजळे यांनी वेळोवेळी पाठपुरावा व प्रयत्न केला होता, त्यांच्या पाठपुराव्या नंतर राज्याचे मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंञी नितीन गडकरी यांच्या सहकार्याने शासनाच्या "राष्ट्रीय रोप-वे कार्यक्रम पर्वतमाला" या अंतर्गत मायंबा ते मढी या ३.६ किमीच्या हवाई अंतरामध्ये सदर रोप-वे सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
या प्रकल्पामुळे बीड-नगर जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला नवी दिशा मिळणार असुन ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या यामुळे वाढणार आहे. ग्रामीण भागातील लोकांना रोजगाराच्या नवीन संधी देखील यामुळे उपलब्ध होतील. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे दोन्ही जिल्ह्यातील पर्यटन आणि दळणवळण क्षेञाला चांगला फायदा होणार आहे. दरम्यान, हा रोप-वे सुरू करुन नाथ भक्तांना सुविधा उपलब्ध करुन दिल्याबद्दल ना. पंकजाताई मुंडे यांनी मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंञी नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत.
••••
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा