रस्ता झाला छान पण बाभळींनी केलं हैराण !

 परळी -धर्मापुरी रस्त्यावरील 'बाभळबनाने' वाढवला आपघातांचा धोका !

रस्त्यावरील दोन्ही बाजुंनी फांद्या:वाहनधारक काढतात 'मधला मार्ग' 

परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

परळी -धर्मापुरी रस्त्यावरील दोन्ही बाजूस अडथळा ठरणाऱ्या बाभळबनाने आपघातांचा मोठा धोका निर्माण केला आहे.रस्ता झाला छान पण बाभळींनी केलं हैराण ! अशी वाहनधारकांची अवस्था झाालेली आहे. रहदारीस अडथळा आणि आपघाताला निमंत्रण देणारे रस्त्यावरील हे बाभळीचे फाटे तोडून वाहतूक सुरळीत होईल याची काळजी घेण्याची मागणी होत आहे.

        परळी धर्मापुरी रोडच्या दोन्हीही बाजूला बाभळींची झाडे मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे दुचाकी चालवणारांसाठी असणारी पांढरी पट्टी पूर्णपणे या बाभळींच्या खाली गेलेली आहे...नियम माहित असूनही त्यामुळे दुचाकीस्वार रोडच्या मध्यभागी  येत आहेत. मागच्या वर्षी या रोडची दुरुस्ती झाली होती त्यामुळे बहुतांश वाहतूक या मार्गाने होत आहे. नांदेड अहमदपूर महामार्गाला जोडणारा हा मार्ग आहे. रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूने वाढलेल्या झाडांमुळे संपूर्ण वाहतुकीला याचा अडथळा होत आहे.ही बाभळीची झाडे तोडणे आवश्यक असून अपघातांची शक्यता या रोडवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !