जय महाराष्ट्र प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरी

शिवशाहीर अरविंद घोगरे यांच्या जाज्वल्य पोवाड्याने शिवप्रेमी भारावले

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ इतिहासापुरते सीमित न राहता प्रत्येक पिढीच्या मनामनांत प्रेरणादायी आदर्श बनले आहेत. त्यांचा शौर्य, धैर्य आणि प्रजाहितदक्ष नेतृत्वाचा वारसा जतन करण्यासाठी जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने भव्य शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रतिपादन  शिवशाहीर अरविंद घोगरे यांनी केले. 


सोमवार, 17 मार्च रोजी संध्याकाळी 6:35 वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती, मोंढा मैदान येथे शिवजयंती उत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, आई तुळजाभवानी, माँसाहेब जिजाऊ , छत्रपती संभाजी महाराज व विश्वहिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन आणि भगव्या ध्वजारोहण भाजपाचे जिल्हा सरचिटणीस दत्ताप्पा ईटके, रा.काँ. तालुकाध्यक्ष वैजनाथ सोळंके, शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, रा.काँ.श . प. ज्येष्ठ नेते बाळासाहेब देशमुख, उत्तम माने,शहराध्यक्ष ॲड.जीवन देशमुख, भा.ज.यु.मो प्रदेश उपाध्यक्ष ॲड.अरुण पाठक,शिवसेना (शिंदे) तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे,शहर प्रमुख वैजनाथ माने, विविध व्यापारी संघटनेचे अध्यक्ष माऊली फड , बंडू गरुड, फडकरी आप्पा, जनसंग्रामचे अध्यक्ष तुळशीराम पवार,राष्ट्रीय काँग्रेसचे कार्याध्यक्ष शशिशेखर चौधरी, मनसे तालुकाप्रमुख श्रीकांत पाथरकर, वंचित आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे, कवी प्राचार्य अरुण पवार, ज्येष्ठ क्रीडा शिक्षक सुभाष नाणेकर, माजी नगरसेवक राजेंद्र सोनी, संजय सुरवसे शाहीर आनंद मुंडे, प्रा.शंकर कापसे, देवराव कदम यांचा हस्ते करण्यात आले. व त्यानंतर जिजाऊ वंदना आणि प्रेरणा मंत्र घेण्यात आले उपस्थित शिवभक्तांनी जय भवानी, जय शिवाजी तुमचं आमचं नातं काय जय भवानी जय शिवरायच्या गजरात हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांच्या चरणी वंदन केले. महाराजांचा ध्वज वारंवार फडकत राहो, अशी भक्तीभावाने प्रार्थना करण्यात आली.

दरम्यान हा सोहळा अनुभवण्यासाठी शिवप्रेमींच्या उत्स्फूर्त उपस्थितीने संपूर्ण मैदान गजबजून गेले होते. भगवे झेंडे फडकवत आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय च्या घोषणांनी संपूर्ण परिसर शिवमय झाला होता. मोठ्या संख्येने युवक, महिला आणि नागरिक या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले.

तीन मान्यवरांचा विशेष सन्मान

    शिवरायांच्या शिकवणीप्रमाणे सामाजिक योगदान देणार्‍या व्यक्तींच्या कार्याचा गौरव करणे, हाच खरा शिवस्मरणाचा सन्मान आहे. त्यानुसार, राकेश चांडक, रघुनाथ फड आणि रमेश चव्हाण या समाजसेवकांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांना सन्मानपत्र ,मानचिन्ह आणि शाल श्रीफळ प्रदान करून त्यांच्या कार्याची कृतज्ञतापूर्वक दखल घेतली गेली.

वैद्यनाथ भक्ती मंडळास स्वच्छता साहित्य भेट - समाजसेवेचा संदेश

छत्रपती शिवाजी महाराज फक्त पराक्रमी योद्धेच नव्हे, तर आदर्श शासक आणि सामाजिक भान असलेले नेतृत्व होते. त्यांच्या प्रेरणेतून वैद्यनाथ भक्ती मंडळास स्वच्छता साहित्य भेट देण्यात आले. स्वच्छतेचा संदेश रुजवण्यासाठी समितीने हा उपक्रम राबवला, जो समाजसेवा आणि राष्ट्रीय कर्तव्यभावनेचे प्रतीक ठरला.

शिवशाहीर अरविंद घोगरे यांच्या पोवाड्याने वातावरण भारावले

सुप्रसिद्ध शिवशाहीर अरविंद घोगरे यांच्या जाज्वल्य पोवाड्याने संपूर्ण शिवभक्त भारावून गेले. त्यांचा ओजस्वी आवाज, ज्वलंत शब्द, आणि जोशपूर्ण शैलीने उपस्थित प्रत्येकाच्या काळजाचा ठाव घेतला. शिवरायांचे अद्वितीय शौर्य, स्वराज्य स्थापनेमागील त्याग आणि संघर्ष यांचे प्रभावी चित्रण त्यांनी आपल्या पोवाड्यातून सादर केले. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांना भरभरून प्रतिसाद दिला.या कार्यक्रमातील सूत्रसंचालन रमेश चौगुले प्रास्ताविक प्रा. अतुल दुबे केले तर आभार मोहन परदेशी यांनी मानले.

या भव्य सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी शिवजयंती उत्सव समितीचे प्रमुख मार्गदर्शक अभयकुमार ठक्कर, जय महाराष्ट्र प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा.अतुल दुबे,माजी नगरसेवक रमेश चौंडे, शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष मोहन परदेशी आणि कार्याध्यक्ष बबन ढेंबरे ,शिवाजीनगर विभाग प्रमुख सुरेश परदेशी, छत्रपती शिवाजी महाराज चौक विभाग प्रमुख संजय सोमाणे, तसेच मनिष जोशी, दिनेश लोंढे, बजरंग औटी, अमित कचरे, सचिन लोढा, नरेश मैड, लक्ष्मण मुंडे, योगेश घेवारे, विजय पवार, योगेश जाधव, जगन्नाथ तुपसौंदर, सोमनाथ गायकवाड, पंकज पांचाळ, संस्कार पालीमकर, बालाजी सातपुते,आकाश जाधव,तुकाराम साठे, शेख बाबु ,कृष्णा टेके, गणेश काकडे, रोहित बोले, आर्यन पोरे, कृष्णा बेदरकर, राहुल फुले यांनी अथक परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !