दोघा बाप-लेकावर गुन्हा दाखल
रस्त्यात मोटार सायकल उभी का केली म्हणून शेतकऱ्यास गजाने बेदम मारहाण !
दोघा बाप-लेकावर गुन्हा दाखल
केज :-
सौंदणा ता. केज शिवारात एका शेतकऱ्यास दोघा बापलेकाने गजाने बेदम मारहाण केली. या मारहाणीत मनगट फॅक्चर झाले असून गंभीर जखमी झाले आहेत. तर पाठीवर, डोक्यावर, खांद्यावर सुज आली आहे. या प्रकरणी युसुफवडगाव पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.
सौंदणा ता. केज येथील शेतकरी चंद्रकांत कविदास ढोबळे वय (४८ वर्ष) हे बनसारोळा येथे वास्तव्यास असून त्यांची सौंदणा शिवारात शेती आहे. हनुमंत श्रीरंग काकडे व त्यांच्यात वाटेवर गाडी लावण्या वरून कुरबुर झाली होती. दोन दिवसांनी १८ मार्च रोजी रात्री ११.४५ वाजेच्या सुमारास पिकाला पाणी देण्यासाठी चंद्रकांत ढोबळे गेले असता हनुमंत काकडे व त्याचे वडील श्रीरंग काकडे या दोघांनी आता कुठे जातोस ? त्या दिवशी गाडी बाजूला का काढायला लावलीस. असे म्हणत काठीने व गजाने चंद्रकांत ढोबळे यांच्या मनगटावर, पोटरीवर, डोक्यावर, पाठीवर मार दिला.
या मारहाणीत त्यांचे मनगट फॅक्चर झाले असून ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या पाठीवर, डोक्यावर, खांद्यावर मारल्याने सुज आली आहे. तेथून जाणाऱ्या दोघांना पाहून ते दोघे बापलेक पळून गेले.
चंद्रकांत ढोबळे यांच्या तक्रारी वरून युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात हनुमंत काकडे, श्रीरंग काकडे विरुद्ध गु. र. नं. ७८/२०२५ भा. न्या. सं. ११५(२), ११८(१), ११८(२), ३५१(२), ३५२, ३(५) गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार जावेत पठाण हे करीत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा