परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

धुनकेश्वर अर्बनच्या अध्यक्ष उपाध्यक्ष सह ११ जणांवर गुन्हा


चाळीस लाख रूपयांची आर्थिक फसवणुक

माजलगाव: शहरातील धुनकेश्वर अर्बन निधी लि. माजलगाव या संस्थेत ठेवलेल्या ४० लाख २५ हजार ३६३ रूपयांच्या ठेवी मिळत नसल्याने त्रिंबक म्हतारबा यादव यांच्या फिर्यादीवरून धुनकेश्वर संस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, शाखाधिकारी व इतर अधिकारी, कर्मचा-यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

       दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, धुनकेश्वर अर्बनच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, शाखाधिकारी, अधिकारी व कर्मचा-यांनी ज्यादा व्याजदराचे अमिष दाखवत ठेवी ठेवण्यास सांगीतले व तुम्हाला गरज पडतील त्यावेळेस वापस देउ असे आश्वासन दिले. त्यामुळे त्रिंबक यादव यांनी घरगुती व्यवहारातील पैसे आठ लाख ८४ हजार ५६२ रुपये ,चार लाख रूपये, दोन लाख रूपये, तीन लाख रूपये, चार लाख रूपये असे विवीध ठेव पावती क्रमांकाने एकुण एकविस लाख ८४ हजार ५६२ रूपयांच्या ठेवी जमा केल्या. पत्नी कौशल्या त्रिंबक यादव यांच्या नावे आठ लाख तीन हजार १२९, मुलगी कावेरी अनंत खेत्री यांच्या नावे ३७ हजार ६७२, पाच लक्ष रूपये, पाच लक्ष असे एकुण १० लाख ३७ हजार ६७२ रूपये विवीध ठेव पावती क्रमांकाने ठेवी ठेवलेल्या आहेत. त्रिंबक यादव यांचे एकुण ४० लाख २५ हजार ३६३ रूपये ठेवीच्या स्वरूपात ठेवले आहेत. यादव व त्यांचे कुटूंबीय मुदत ठेवीवरील व बचत खात्यावरील रक्कम मागण्यासाठी ता. ११ जानेवारी २०२५ रोजी मागण्यासाठी गेले असता पैशांची वारंवार मागणी करूनही दि. ३ मार्च २०२५ रक्कम देण्यास संस्थेने इन्कार करत फिर्यादीस आरेरावीची भाषा शिवीगाळ करत यादव यांना हाकलुन दिले. पैसे मिळत नसल्याने आर्थिक फसवणुक झाल्याचे लक्षात येताच पोलिसांना याबाबत माहिती देवुनही तक्रार दाखल होत नसल्याने त्रिंबक यादव यांनी अॅड. नारायण गोले यांच्या मार्फत सत्र न्यायालयात प्रकार दाखल केले व न्यायालयाच्या आदेशानुसार धुनकेश्वर अर्बन निधीचे अध्यक्ष शिवहरी यादव, उपाध्यक्ष सचिन रोडगे, सचिव रामेश्वर तांदळे, सचिव पांडुरंग तांदळे, शाखाधिकारी शंकर यादव, दत्तात्रय नांदुरकर, वसुली अधिकारी दिलीप भिसे, कॅशीयर अशोक मोरे, लोन आफीसर सुनिल फपाळ, लिपीक संजीवनी कटरे, सेवक अनंत धपाटे यांच्याविरूध्द वित्तीय संस्थांमधील ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!