सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्या पथकाची मटक्यावर धाड; दोन जण ताब्यात

केज :- सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्या पथकाने केज शहरात मटकाबुक्की विरुद्ध केलेल्या कारवाईत रोख १६ हजार रू. आणि साहित्य असे मिळून एकूण २३ हजार रु. किमतीचा मुद्देमाल जप्त करून दोघांना ताब्यात घेतले आहे.

 केज शहरातील मंगळवार पेठ कॉर्नर येथे शनी मंदिर जाणारे रोडवरील एका पानपट्टी जवळ  तसेच शनी मंदिर जवळ मटका सुरू असल्याची माहिती एका गुप्त खबऱ्या मार्फत सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांना मिळताच त्यांनी ही माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत काँवत आणि अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांना देवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्याचे आदेश त्यांच्या पथकाला दिले. आदेश मिळताच कमलेश मीना यांच्या पथकातील पोलीस हवालदार डापकर, पोलीस नाईक अनिल मंदे, पोलीस नाईक राजू गुंजाळ यांच्या पथकाने कल्याण नावाचा मटका जुगार घेणारा अजीम जमीर सय्यद याला ताब्यात घेतले. त्याच्या कडून ३ हजार ८३० रू नगदी आणि मोबाईल असा एकूण ९ हजार ८३० रू चा मुद्देमाल ताब्यात घेतला. तर त्यांच्या दुसऱ्या पथकातील पोलीस हवालदार विकास चोपणे, भुंबे आणि टकले यांनी शनी मंदिरा जवळून चालता फिरता मटका घेणारा शेख अब्दुल करीम शेख अब्दुल रहीम याला ताब्यात घेत त्याच्याकडून रोख १२ हजार ९२० आणि इत्तर साहित्य असा एकूण १३ हजार ९२० रू चा मुद्देमाल ताब्यात घेतला. या दोन्ही कारवाईत एकूण नगदी १६ रू. सह एकूण २३ हजार ७२० चा मुद्देमाल जप्त केला आहे. दोघांना ताब्यात घेतले आहे. कारवाईने अवैध धंद्यावाले धास्तावले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !