इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

 परळी वैजनाथ येथे गौवंश रक्षणासाठी आमरण उपोषण सुरू

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)

       परळी वैजनाथ हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असून, या पवित्र क्षेत्रात गौवंश संरक्षणासाठी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी करत आजपासून (दि. ३ मार्च २०२५) नगर परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.


 उपोषणकर्त्यांनी खालील प्रमुख मागण्या केल्या आहेत:


परळी परिसरातील अवैध कत्तलखाने त्वरित बंद करावेत.


गौवंश मास विक्री करणारी दुकाने बंद करावी व यापुढे विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.


गौरक्षकांवर पोलिसांकडून होणारी अपमानजनक वागणूक थांबवावी.


रस्त्यावरील गौवंशासाठी नगर परिषदेतर्फे कोंडवाड्याची व्यवस्था करावी.


२७ फेब्रुवारी २०२४ महाराष्ट्र शासन निर्णय पशुसंवर्धन विभाग यांच्या वतीने पशूंच्या खरेदी विक्री संदर्भात काढलेल्या आदेशाची कडक अंबल बजावणी करणे.


गौ तस्करी करणाऱ्यावर कडक कार्यवाही करावी.

गौसेवकां वरील होणारे हल्ले थांबवून पोलिसांकडून संरक्षण द्यावे.


 या मागण्यांसाठी बळीराम परांडे,विजय बडे,माऊली मंडलिक गोरक्षण सेवा संघ महाराष्ट्र राज्य परळी वैजनाथ नगर परिषदेसमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. या आंदोलनाला अनेक सामाजिक संघटनांचा पाठिंबा मिळत असून, प्रशासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!