युवकांनी उद्योजकतेला प्राधान्य द्यावे - डॉ. प्रशांत दिक्षित

अध्यापकांनी ज्ञानदानाचे कार्य अविरतपणे करावे - डॉ. सुधाकर गुट्टे यांचे प्रतिपादन

अमोल जोशी / पाटोदा - आपल्या विद्यापीठाला ज्या महान विभूतींचे नाव दिलेले आहे अशा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्राप्त केलेल्या कित्येक पदव्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन युवकांनी अनेक पदव्या प्राप्त करून ज्ञान संपादन करावे तसेच नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणास अभिप्रेत असल्याप्रमाणे पदवीधारक युवकांनी नोकरी मिळवण्याऐवजी नोकरी देणारे व्हावे यासाठी युवकांनी उद्योजकतेला प्राधान्य द्यावे असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसराचे संचालक डॉ. प्रशांत दिक्षित यांनी केले. येथील नवगण शिक्षण संस्था संचालित वसंतदादा पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात २६ मार्च रोजी आयोजित पदवी प्रमाणपत्र प्रदान सोहळ्यात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रोफेसर आबासाहेब हांगे होते. विशेष निमंत्रित अतिथी म्हणून महाविद्यालय विकास समितीचे सदस्य संदीप जाधव,  प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. सुधाकर गुट्टे होते. व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. अभय क्षीरसागर, उपप्राचार्य डॉ. सतिश माउलगे, पदव्युत्तर विभाग संचालक डॉ. गणेश पाचकोरे, कमवि उपप्राचार्य प्रा. नामदेव चांगण, पर्यवेक्षक प्रा. अनिल जोगदंड उपस्थित होते.


आपल्या मार्गदर्शनपर भाषणात डॉ. सुधाकर गुट्टे म्हणाले की, युवकांनी प्राप्त केलेली पदवी हे त्यांच्या पालकांच्या, शिक्षकांच्या व स्वतःच्या  श्रमाचे फलित असून भविष्यातही विद्यार्थ्यांनी अधिकाधिक ज्ञान प्राप्त करावे तसेच अध्यापकांनी अविरतपणे ज्ञानदान करत रहावे. याप्रसंगी संदीप जाधव यांनीही पदवीधारकांना शुभेच्छा दिल्या.


अध्यक्षीय समारोपात प्राचार्य प्रोफेसर आबासाहेब हांगे म्हणाले की, कोणत्याही विद्याशाखेचा पदवीधर देशातील कोणतेही उच्च पद भूषविण्यासाठी पात्र झाला आहे म्हणून युवकांनी प्राप्त केलेल्या पदवीचे मूल्य जाणून घ्यावे.   


कार्यक्रमात प्रारंभी विद्यापीठगीत गायन करण्यात आले. तद्नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संस्थेच्या संस्थापिका कै. केशरबाई क्षीरसागर यांच्या प्रतिमांचे पूजन,  पुष्पमाल्यार्पण व दीपप्रज्वलन  मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. मुख्य कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीताने करण्यात आली.


प्रास्ताविक परीक्षा समिती अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर चौधरी यांनी केले. यानंतर प्राचार्य आबासाहेब हांगे यांचा करिअर कट्टा उपक्रमात उत्कृष्ट प्राचार्य म्हणून जिल्हास्तरावर पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल तसेच डॉ. गणेश पाचकोरे, डॉ. मनोजकुमार प्रकाश, प्रा. अजिंक्य साखरे, डॉ. पद्माकर ससाणे, प्रा. कावेरी खुरणे, डॉ.  शकुंतला बडे यांचा विविध पुरस्कार व उपलब्धी प्राप्त केल्याबद्दल अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यानंतर पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. कुशाबा साळुंके यांनी केले. आभारप्रदर्शन प्रा. शरद पवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. सोमनाथ लांडगे, प्रा. मनिषा गाढवे, प्रा. विमल अलापुरे, डॉ. कल्याण घोडके, डॉ. लक्ष्मण गाडेकर यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास सर्व विद्याशाखांचे पदवीधर विद्यार्थी, प्राध्यापक  उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार