सख्ख्या मावस भावानेच तेरा वर्षाच्या अल्पवयीन मावस बहिणीला पळवून नेले
केज :- मावशी व काका हे नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी बाहेरगावी गेल्याची संधी साधून चक्क नात्याने सख्खा मावस भाऊ असलेल्या नराधमाने त्याच्या तेरा वर्षाच्या मावस बहिणीला फुस लावून पळवून नेले आहे.
केज तालुक्यातील एका वस्तीवर आई -वडिलां सोबत राहत असलेल्या तेरा वर्ष वयाच्या अल्पवयीन मुलीचे आई-वडील हे दि. २० मार्च रोजी सायंकाळी ५:३० वा. च्या सुमारास नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी बाहेर गावी गेले होते. ही संधी साधून त्या अल्पवयीन मुलीचा मावसभाऊ त्यांच्या घरी आला. त्याने दि. २१ मार्च रोजी मध्यरात्री २:३० वा. च्या सुमारास चहा प्यायला म्हणून अल्पवयीन मावस बहिणीला त्याने आणलेल्या गाडीत घेवून गेला. मात्र तो परत घरी आला नाही. मुलीच्या नातेवाईकांनी दोघांचा शोध घेतला मात्र ते आढळून आले नाहीत. म्हणून दि. २१ मार्च रोजी मुलीच्या आईच्या तक्रारी वरून अल्पवयीन मावस बहिणीला अज्ञात कारणासाठी पळवून नेले म्हणून मुलीच्या मावसभावा विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. ११३/२०२५ भा. न्या. सं. १३७(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास पोलीस उपनिरीक्षक शैलेश जोगदंड हे करीत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा