जालन्याच्या 'त्या' तरूणांवरील अत्याचाराची पालकमंत्री ना. पंकजा मुंडे घेतली गंभीर दखल

जिल्हा पोलीस अधीक्षकांशी केली चर्चा ; आरोपींविरुद्ध कठोर कारवाईचे आदेश


अत्याचारित तरूणांच्या प्रकृतीची केली आस्थेने चौकशी ; कुटुंबियांनी घेतली मुंबईत भेट

जालना ।दिनांक ०५।

अन्वा (ता. भोकरदन) येथील कैलास बोराडे या तरूणांवर झालेल्या अत्याचार प्रकरणाची जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. पंकजा मुंडे यांनी गंभीर दखल घेतली असून यासंदर्भात त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना आज दूरध्वनीवरून संपर्क साधून आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, त्या तरूणाच्या कुटुंबियांनी ना. पंकजाताईंची मुंबईत भेट घेतली. 

         महाशिवरात्रीच्या दिवशी अन्वा येथील रहिवासी असलेल्या कैलास बोराडे या तरुणास कार्ला जानेफळ येथील वटेश्वर मंदिरात भागवत दौंड व नवनाथ दौंड यांनी मारहाण करून भट्टीत गरम केलेल्या सळईने सर्व अंगावर डाग देऊन अतिशय अमानुषपणे अत्याचार केले. बोराडे याच्यावर सध्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत, दरम्यान पालकमंत्री ना. पंकजा मुंडे यांनी आज पोलिस अधिक्षकांशी फोन करुन घटनेची सविस्तर माहिती घेतली. या घटनेतील एक आरोपी अटकेत आहे. दुसर्‍याचा शोध तातडीने लावून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी असे आदेश त्यांनी पोलिस अधीक्षकांना दिले. दरम्यान कैलास बोराडे या तरूणांच्या भावाने आणि कुटुंबातील सदस्यांनी ना. पंकजा मुंडे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कैलासच्या प्रकृतीची आस्थेने चौकशी केली आणि आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्याबद्दल कुटुंबियांना आश्वस्त केले.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार