मोजमाप पुस्तिकेत नोंदी घेवून बिल काढण्यासाठी ५० हजार रु. मागितले

सरपंच पतीचा पंचायत समितीत आत्मदहन करण्याचा प्रयत्न !


केज :- घनकचरा व्यवस्थापन, सांडपाण्याचे शोषखड्डे व सार्वजनिक शौचालय बांधकाम या कामांची मोजमाप पुस्तिकेत नोंद घेऊन बिल काढण्यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी महिला सरपंचाकडे ५० हजार रुपयेची मागणी केली. त्या पैकी त्यांना २० हजार रु. देऊनही ३० हजार रु. न दिल्यामुळे त्यांनी बिल काढले नसल्याने व्यथित होऊन संतप्त झालेल्या सरपंच पतीने केज पंचायत समितीमध्ये आत्मदहनाचा प्रयत्न केला. 


केज तालुक्यातील डोका येथील महिला सरपंच कमल गोरख भांगे यांनी गावांमध्ये घनकचरा व्यवस्थापन व सांडपाणी नियोजन यासाठी आणि सार्वजनिक शौचालय याची कामे केलेली आहेत. सर्व कामे पूर्ण होऊन देखील त्याची मोजमाप पुस्तिकेत नोंद घेऊन त्यांच्या बिलासाठी त्यांनी वारंवार ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे कागद-पत्रांनिशी मागणी केली. परंतु ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता आंधळे, कनिष्ठ अभियंता चव्हाण आणि शाखा अभियंता वंदना साळवे या दोघांनी सरपंच पती गोरख भांगे यांच्याकडे ५० हजार रु. ची मागणी केली.

गोरख भांगे यांनी कार्यकारी अभियंता आंधळे यांना त्यापैकी २० हजार रुपये त्यांना नगदी दिले. मात्र अद्यापही त्यांचे बिल निघाले नाही. त्या बाबत त्यांनी चौकशी केली असता उर्वरित ३० हजार रुपये जो पर्यंत देणार नाहीत; तो पर्यंत मोजमाप पुस्तिकेत नोंदी घेऊन बिल मिळणार नाही. अशी अरेरावीची व मग्रुरीची भाषा कनिष्ठ अभियंता चव्हाण आणि शाखा अभियंता साळवे यांनी सरपंच पती गोरख भांगे यांना वापरली. तसेच खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली. 

त्यामुळे संतप्त झालेल्या सरपंच पती गोरख भांगे यांनी दि. २० मार्च रोजी दुपारी ४:०० वा. च्या सुमारास केज पंचायत समितीच्या इमारतीमध्ये आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र आरडाओरड आणि आत्मदहनाची माहिती मिळताच प्रभारी गटविकास अधिकारी समृद्धी दिवाने-काळे यांनी केज पोलिसांना फोन करून त्यांना पाचारण केले. पोलीस उपनिरीक्षक शैलेश जोगदंड आणि त्यांचे पोलीस नाईक शिवाजी कागदे यांनी सरपंच पती गोरख भांगे यांच्या हातातील काडेपेटी खेचून घेत त्यांना आत्मदहन करण्या पासून रोखले 

________________________________

गटविकास अधिकारी यांनी प्रसार माध्यमांना रोखण्याचा केला प्रयत्न ! :-  सरपंच पती गोरख भांगे हे त्यांच्या केलेल्या कामाच्या बिलापोटी प्रशासनाकडून होत असलेली अडवणुकीची माहिती प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधी देत असताना त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या गटविकास अधिकारी समृद्धी दिवाने-काळे यांनी पत्रकारांनी याचे व्हिडिओ किंवा फोटो घेऊ नयेत म्हणून त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. 

_______________________________


दोन दिवसांचा अल्टीमेटम्:- गोरख भांगे यांची प्रभारी गटविकास अधिकारी समृध्दी दिवाणे-काळे, कार्यालयीन अधीक्षक सविता वनवे-शेप आणि पोलीस उपनिरीक्षक शैलेश जोगदंड यांनी समजूत काढली मात्र आता जर दोन दिवसात माझे बिला संदर्भात कारवाई झाली नाही तर येत्या शनिवारी के ज किंवा डोका येथे पुन्हा आत्मदहन करून जिवन संपविणार असल्याचा अल्टीमेटम् गोरख भांगे यांनी प्रशासनाला दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार