जलदगती तपासाची कौतुकास्पद कामगिरी

परळी पोलीस बनले 'फास्टरफेणे' : सर्व प्रक्रिया पूर्ण करीत अवघ्या पाच तासात दोषारोपपत्र न्यायालयासमोर !

सकाळी घडला गुन्हा, तात्काळ आरोपी अटक,दोन तासात परिपूर्ण तपास अन् पाच तासात थेट चार्जशिटच केलं दाखल


परळी वैजनाथ , प्रतिनिधी...

       एखादा गुन्हा घडल्यानंतर गुन्हा नोंदविण्याची घंटोन् घंटे चालणारी प्रक्रिया, त्यानंतर आरोपींना अटक करण्यात व त्यानंतर संपूर्ण तपासासाठी खूप मोठा कालावधी लागतो. त्यानंतर बऱ्याच कालावधीनंतर दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाते हा पोलीस प्रक्रियेतील नेहमीचा अनुभव आहे. मात्र आज परळी शहर पोलिसांनी एका गुन्ह्यांमध्ये आश्चर्यकारक व अतिशय जलदगती कामगिरी केली असुन सकाळी घडलेल्या गुन्ह्याची संपूर्ण प्रक्रिया व तपास पूर्ण करून अवघ्या पाच तासात या गुन्ह्य़ाचे दोषारोपपत्रच थेट न्यायालयात दाखल केले आहे. या कौतुकास्पद कामगिरीमुळे परळी पोलीस 'फास्टरफेणे' बनल्याचे दिसुन येत आहे.

     

       याबाबत अधिक माहिती अशी की,आज (दि. 28)  रोजी परळी शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये सकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान कडबा मार्केट वखार महामंडळाच्या मोकळ्या जागेतील झाडेझुडपे असलेल्या ठिकाणी महिलांना अतिशय लज्जास्पद वाटणारा गुन्हा घडला आहे. मोकळ्या जागेतील झाडेझुडपे असलेल्या ठिकाणी प्रात:विधीसाठी काही महिला या गेलेल्या असताना त्या ठिकाणी एक आरोपी हा तिथे दबा धरून बसला होता. प्रात:विधीसाठी बसलेल्या महिलांच्या समोर जाऊन व महिलांना मनाला लज्जास्पद वाटणारे वर्तन व अश्लील कृती त्याने केल्या.तसेच येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना वाईट उद्देशाने इशारे केले. या बाबतची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. त्यावरून गु र न 67/2025 कलम - 74,75(2 ),79 BNS प्रमाणे सकाळी 10.33 वाजता आरोपी भुजंग वाघमारे वय २८ वर्षे रा.रामनगर याच्याविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला होता.

         परळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ यांनी हे प्रकरण गांभीर्यपूर्वक घेऊन दाखल गुन्हातील आरोपीस तात्काळ ताब्यात घेतले. त्याचेकडे व साक्षीदारांकडे तपास करुन आरोपीविरुद्ध पुरावा मिळून आल्याने,वरिष्ठ कार्यालयाकडून कागदपत्राचे पडताळणी करून आरोपीविरुद्ध पोलीस ठाणे, दोषारोप नंबर.33/25  सह कोर्टात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले. न्यायालयात एस एस सी क्रमांक  151/25 दि.28/3/2025 असा प्राप्त आहे. या  गुन्ह्याचा तपास सपोनि योगेश शिंदे यांनी केला आहे. महिला विषयांच्या प्रकरणांमध्ये तात्काळ कारवाई करण्याचे वरीष्ठचे आदेश आहेत. त्यानुसार परळी पोलीसांनी जलदगती तपास करीत या गुन्ह्याचे दोषारोप अवघ्या पाच तासात न्यायालयासमोर सादर केले आहे. परळी पोलीसांनी अतिशय कौतुकास्पद कामगिरी केली असुन परळीत पहिल्यांदाच इतक्या जलदगतीने गुन्हा घडणे,नोंद होणे,आरोपी अटक, सखोल तपास, पुरावे अन्य प्रक्रिया,वरिष्ठांची पडताळणी आणि न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करणे ही प्रचंड वेळखाऊ प्रक्रिया अवघ्या पाच तासात पुर्ण झाल्याचे उदाहरण बघायला मिळाले आहे.

       या प्रकरणात जलदगती तपासासाठी पोलीस अधीक्षक नवनीत, अप्पर पो. अधीक्षक श्रीमती चेतना, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे स्तरावर पो निरीक्षक रघुनाथ, सपोनि योगेश  ,नितीन, मपोहे सविता, गोविन्द, किशोर पो. शि.पंडीत, रामकिशन, धनश्री,वर्षा, यांनी कामगिरी केली. जलदगती तपास वेळेत पुर्ण करुन अवघ्या 05 तासात दाखल गुन्ह्याचे दोषारोप पत्र न्यायालयात सादर केले. याबद्दल परळी शहर पोलीसांचे कौतुक होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार