आळंदीत परळीच्या कन्या विजयाताई दहिवाळ यांचा महिला दिनी सन्मान
आळंदी, प्रतिनिधी...
ऑल इंडिया सोनार फेडरेशनच्या वतीने राज्यातील सोनार समाजातील कर्तुत्वान महिलांचा सन्मान करण्यात आला याच शानदार सोहळ्यात परळीच्या कन्या विजयाताई दहिवाळ यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल,फेटा विशेष प्रमाणपत्र देऊन जागतिक महिला दिनानिमित्त सन्मानित करण्यात आले.
ऑल इंडिया सोनार फेडरेशनच्या राज्यात सोनार समाजाच्या शाखा आहेत त्या सर्व शाखांना एकत्रित करून सोनार समाजातील विविध क्षेत्र उल्लेखनीय काम करणाऱ्या कर्तुत्वान महिलांचा सन्मान केला जातो
गेली दहा वर्षापासून ऑल इंडिया सोनार फेडरेशनच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पुरस्कार वितरण सोहळा साजरा करत असते यावेळी यावेळी परळीच्या कन्या सुप्रसिद्ध चित्रकार स्वातंत्र्य सेनानी दत्तात्रय दहिवाळ गुरुजी यांच्यात विजयाताई दहिवाळ यांना सामाजिक व राजकीय क्षेत्रात व सोनार समाजासाठी उल्लेखनीय काम केल्याबद्दल त्यांचा जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून श्री क्षेत्र आळंदी येथे ऑल इंडिया सोनार फेडरेशनच्या वतीने शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. विजयाताई दहिवाळ यांना यापूर्वीही विविध सामाजिक संस्था राजकीय पक्ष संघटनेच्या वतीने पुरस्कार मिळालेले असून त्यांचे सामाजिक क्षेत्रातील काम अधिक दखलपात्र असल्याचे संयोजकाच्या वतीने सांगण्यात आले. म्हणून यावर्षीचा सन्मान विजयाताई दहिवाळ यांना आमदार उमाताई खापरे यांच्या हस्ते पुरस्कार प्रधान करण्यात आला.
पुरस्कार प्राप्त विजेत्या विजयाताई दहिवाळ यावेळी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की हा जो ऑल इंडिया सोनार फेडरेशने माझा सन्मान केला तो सन्मान निश्चितच पुढील माझ्या कार्याला बळ देईल व अजूनही काम करण्याची उमेद देईल असे आपल्या मनोगतात श्रीमती दहिवाळ यांनी सांगितले.
आळंदी येथे संपन्न झालेल्याऑल इंडिया सोनार फेडरेशनच्या सोहळ्याला राज्यभरातील सोनार समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा कार्यक्रमाला ऑल इंडिया सोनार फेडरेशन महिला विकास मंच महाराष्ट्र राज्य,उपाध्यक्ष व आयोजक अनिताताई दारवेकर नागपूर, आणि आयोजक जयश्री ताई वाडकर समाजसेविका पुणे यांनी केले तर प्रमुख पाहुणे म्हणून उमा गिरीश खापरे विधान परिषद आमदार पुणे.सुरेखा बाबुराव कपिले, सहाय्यक पोलीस आयुक्त मुंबई. सुवर्णाताई सुभाष शेठ महाले, समाजसेविका पुणे.रत्नाताई बांबुर्डेकर उद्योजिका पुणे अंबिका ताई डहाळे परभणी मीनाताई सोनार यांची प्रमुख उपस्थितीत सत्कार सोहळा संपन्न झाला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा