चुकवू नये असा सोहळा...आवर्जुन उपस्थित रहावे!
वसंतराव देशमुख गुरुजी लिखित मूल्यवर्धक, समाजहितेशी 'चारित्र्य निर्माण' पुस्तक : ३१ मार्चला परळीत प्रकाशन सोहळ्याचे आयोजन
परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
परळी वैजनाथ येथील वसंतराव देशमुख गुरुजी लिखित मूल्यवर्धक, समाजहितेशी 'चारित्र्य निर्माण' पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे ३१ मार्चला परळीत आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यास मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.या प्रकाशन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांकडून करण्यात आले आहे.
वसंत किशनराव देशमुख (गुरुजी) यांनी आपल्या अनुभव विचारांना शब्दरुपी पुष्पात गुंफुन मूल्यवर्धक, समाजहितेशी असे केलेले लिखाण पुस्तक रुपाने वाचकांसाठी उपलब्ध होत आहे. 'चारित्र्य निर्माण' असे नामकरण केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन चैत्र शु. २/३ शके १९४७, सोमवार, दि.३१ मार्च, २०२५ रोजी सायं. ४.३० वा. 'अक्षदा मंगल कार्यालय, परळी वै. येथे होत आहे.या प्रकाशन समारंभासाठी न्यायमूर्ती अंबादासराव जोशी (निवृत्त न्यायाधीश, मुंबई उच्च न्यायालय, लोकायुक्त, गोवा राज्य) व डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन (प्र. कुलगुरु यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक) यांची उपस्थिती लाभणार असून या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन या सोहळ्याचे संयोजक व पुस्तकाचे प्रकाशक विलास वसंतराव देशमुख,विद्याधर वसंतराव देशमुख,श्रीधर वसंतराव देशमुख, ॲड.राजेश्वर वसंतराव देशमुख यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा