अठरा वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
गेवराई, प्रतिनिधी..
गेवराई- अठरा वर्षीय युवकाने घरातील आडुला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी बीडच्या गेवराईत घडली.दरम्यान आत्महत्या कशामुळे केली याचे कारण आद्याप तरी स्पष्ट झाले नाही.
शिवराज निलेश शेरे रा.रांजणी ता.गेवराई जि.बीड असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.सध्या सुगीचे दिवस असल्याने कुटुंबीयातील सर्व सदस्य गहू कापणी करीता शेतात गेले होते.दुपारी दोन वाजेच्या दरम्यान शिवराज शेरे याने घरातील आडुला गळफास घेऊन आत्महत्या केली.शाळेतून त्याचा धाकटा भाऊ घरी आल्यानंतर त्याने हा प्रकार पाहता शेतात कुटुंबीयाकडे धाव घेत घटनेची माहीती दिली. गेवराई पोलिसांना माहीती मिळताच तात्काळ घटनास्थळावर दाखल होऊन मृतदेहाचा पंचनामा करून गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयात शिवराज याच्या मृतदेहाचे रात्री आठ वाजेच्या दरम्यान शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर रांजणी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान, शिवराज हा अकरावीचे शिक्षण घेत होता.अवघ्या अठरा वर्षात पदार्पण केलेल्या शिवराज याने कशामुळे हे टोकाचे पाऊल उचलले याचे कारण समोर आले नाही.मात्र, या घटनेमुळे रांजणीत हळहळ व्यक्त होती.
----
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा