इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

 वैद्यनाथ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग चा ९८% निकाल

 परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

       महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्याकडून घेण्यात आलेल्या वार्षिक बेसिक बी.एस.सी. नर्सिंग पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाचा निकाल जाहीर झाला आहे, यामध्ये वैद्यनाथ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग, विद्यानगर परळी वै. चा ९८% निकाल लागला.

      याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. सूर्यकांत मुंढे सरांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षक वृंदांचे अभिनंदन केले.  श्री. शेख सर, सौ. गुणप्रिया मॅडम, श्री. राम होळंबे सर, व शिक्षक वृंदाने विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील उज्ज्वल भविष्यासाठी शुभेछा दिल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या