पोलीस ठाण्याच्या आवरातच महिलेने अंगावर पेट्रोल ओतून घेतले !
केज :- परीक्षेला गेलेल्या एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून फुस लावून पळवून नेलेल्या घटनेला दीड महिना लोटला तरी तपास लागत नसल्याने संतप्त मुलीच्या आईने युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या आवारातच स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून घेतल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
या बाबतची माहिती अशी की, अंबाजोगाई तालुक्यातील बारावीच्या वर्गात शिकत असलेली ऋतुजा व्यंकट माने ही अल्पवयीन मुलगी ही दि. ५ फेब्रुवारी रोजी केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या किसान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आपेगाव येथे तिच्या मामाच्या मुली सोबत प्रात्यक्षिक परीक्षेला गेली होती. त्यावेळी तिच्या आत्याचा मुलगा गोपाळ हरीभाऊ काळे आणि आत्या मिरा हरीभाऊ काळे यांनी तिच्या सोबत लग्न करण्याचे आमिष दाखवून फुस लावून पळवून नेले आहे.
या प्रकरणी मुलीच्या आईच्या तक्रारी वरून दि. १५ फेब्रुवारी रोजी युसुफवडगाव पोलीस ठाण्यात तिच्या आत्याचा मुलगा गोपाळ काळे आणि मिरा काळे या दोघा विरुद्ध गु. र. नं. ५०/२०२५ भा. न्या. सं. १३७(२), ३(५) दाखल करण्यात आलेला आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बसवेश्वर चेन्नाशेट्टी हे तपास करीत होते. या घटनेला दीड महिन्या पेक्षा जास्त काळ लोटला आहे. मात्र अद्यापही मुलीचा तपास लागलेला नाही; म्हणून दि.२० मार्च रोजी मुलीची आई योगेश्वरी माने हिने दुपारी १:०० वा. च्या सुमारास युसुफवडगाव पोलिस ठाण्याच्या समोर स्वतः अंगावर पेट्रोल ओतून घेतले. मात्र तिचा आरडाओरडा एकूण पोलीस निरीक्षक राहुल पतंगे, पोलीस उपनिरीक्षक बसवेश्वर चेन्नाशेट्टी आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी तिला आत्मदहन करण्या पासून रोखल्यामुळे अनर्थ टळला.
-----------------------
" आम्ही अपहृत मुलगी आणि तिला फुस लावून पळवून नेलेल्या इसमाचा सोध धेत असून त्याचे मोबाईल सीडीआर काढून त्याचा तपास घेत आहोत."
---- पोलीस उपनिरीक्षक बसवेश्र्वर चेन्नाशेट्टी (युसुफ वडगाव पोलीस ठाणे)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा