जीप व मोटार अपघातात दोघे जागीच ठार
केज :- केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोटार सायकल आणि जीपच्या झालेल्या गंभीर अपघातात मोटार सायकल वरील दोघे जागीच ठार झाले आहेत.
केज तालुक्यातील युसुफ वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत दि. २६ मार्च रोजी दुपारी २:३० वाजण्याच्या सुमारास सावळेश्वर ते औरंगपुर दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील दोघे मोटार सायकल क्र. (एम एच-२५/ए बी-४१५८) वरून जात असताना त्यांना जीप क्र. (एम एच-२०/जी सी-२१०८) ने जोराची धडक दिली.
या अपघातात मोटार सायकल वरील दोघे जागीच ठार झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अपघातस्थळी रवाना झाले. अपघातात मृत्यू झालेल्या दोघांना शवविच्छेदनासाठी स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात हलविले आहे. मात्र अद्याप पर्यंत दोघंही मृतांची नावे समजू शकलेली नाहीत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा