गोदावरी पात्रात जायकवाडी धरणाचे पाणी सोडण्यात यावे - अनिल बोर्डे

  गेवराई :- गोदावरी पात्रात जायकवाडी धरणाचे पाणी सोडण्यात यावे . सध्या राक्षसभुवन व शहागड येथील पात्र कोरडे झाले आहे सध्या मार्च संपत असून एप्रिलमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई भासणार आहे तसेच शनि अमावस्या असल्यामुळे  राक्षसभुवन येथे महाराष्ट्रातून प्रचंड गर्दी होणार आहे त्यासाठी जायकवाडी धरणातून गोदावरी पात्रात पाणी सोडणे आवश्यक आहे अशी मागणी  मा. संचालक गोदावरी महामंडळ संभाजीनगर, जिल्हाधिकारी बीड, कार्यकारी अभियंता जलनिसारण विभाग क्रमांक  3 बीड तहसीलदार गेवराई यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून बीड जिल्हा ग्राहक पंचायत महाराष्ट्र उपाध्यक्ष अनिल बोर्डे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. 

       सध्या राक्षसभुवन व शहागड येथील गोदावरी पात्र कोरडे पडत आहे. सध्या मार्च महिना संपत आला असून उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. एप्रिल/ मे मध्ये तीव्रता दिसून येणार आहे. राक्षसभुवन येथे महाराष्ट्रातील भाविक शनि अमावस्या निमित्त प्रचंड गर्दी होणार आहे. तसेच पिण्यासाठी व जनावरे इत्यादीसाठी पाणी पुष्कळ प्रमाणात असणे गरजेचे आहे.  पाण्याची मोठी समस्या मोठी समस्या  निर्माण होत असल्यामुळे या भागातील जलस्रोत पातळी खालावली असल्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन जायकवाडी धरणातून पाणी तात्काळ गोदावरी पात्रात सोडणे आवश्यक आहे तरी याबाबत विचारविनिमय करून युद्ध पातळीवर गोदावरी पात्रात पाणी सोडण्यात यावे त्यामुळे गोदावरी नदीच्या सर्व गावांना उन्हाळ्याच्या तीव्रतेमध्ये दिलासा मिळेल याबाबत तात्काळ  कार्यवाही करून सहकार्य करावे अशी विनंती बीड जिल्हा ग्राहक पंचायत उपाध्यक्ष अनिल बोर्डे व गेवराई ग्राहक पंचायत अध्यक्ष प्रा. भानुदास फलके यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार