इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

खळबळजनक: औरंगजेबा संदर्भात समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट; अल्पवयीन दोघांविरुद्ध कारवाई

परळी वैजनाथ, प्रतिनिधी- औरंगजेबा संदर्भात समाज माध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या अल्पवयीन दोघांविरुद्ध कारवाई परळी शहर पोलीसांनी कायदेशीर कारवाई केली आहे.या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

       दोन समाजात द्वेष भावना वाढवण्याच्या उद्देशाने 2 अल्पवयीन इसमांनी इंस्टाग्राम वर दि. 22/3/2025 रोजी  रात्री ९ वाजेच्या दरम्यान  औरंगजेब संदर्भाने आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली. सायबर पोलीस  सोशल मीडियावर लक्ष ठेवून असल्याने ही पोस्ट दिसून आली.  तसेच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर  ही पोस्ट व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आले. सायबर पोलीस कडील उपलब्ध व्हायरल पोस्टवरून पोलीस ठाणे परळी शहर येथे गोपनीय शाखेचे पो का.विष्णू फड  यांच्या फिर्यादवरून गुरन 61/ 2025 कलम 353 ( 2) भारतीय न्याय संहिता  प्रमाणे  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही पोस्ट समाज मध्यमावरून हटविण्यात आली आहे. समाज माध्यमावर चुकीच्या पोस्ट व्हायरल करताना, सामाजिक भावना लक्षात घेऊन संवेदनशील रहावे, विनाकारण पोस्ट व्हायरल करू नये, सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या विरुद्ध कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल तसेच आपापल्या अल्पवयीन मुलांच्या मोबाईलवर पालकांनी लक्ष ठेवावे असे आवाहन पोलीसांनी केले आहे.

 @@@ 

      समाजमाध्यमावर दोन समाजात तेढ निर्माण होईल अशा पोस्ट कोणीही करु नये.अल्पवयीन मुलांचा अशा आक्षेपार्ह पोस्ट करण्यात अधिक प्रमाणात सहभाग निदर्शनास येत आहे.पालकांनी पाल्यासोबत संवाद साधत याविषयीचे गांभीर्य लक्षात आणून द्यावे.सायबर सेल संपूर्ण अशा घटनांकडे लक्ष ठेवून आहे.संबंधितांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी याची दक्षता घ्यावी.

   - रघुनाथ नाचण

पोलीस निरीक्षक, परळी शहर पोलीस ठाणे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!