कोरो एकल महिला सघटनेचा नाविन्यपूर्ण उपक्रम:जागतिक महिला दिनानिमित्त अंबाजोगाई येथे महिला कबड्डी स्पर्धा उत्साहात
अंबाजोगाई (वसुदेव शिंदे).....
अंबाजोगाई येथील मानवलोक च्या प्रांगणात कोरो एकल महिला संघटनेच्या माध्यमातून आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृतिदिना निमित्त त्यांच्या कार्याला, विचारांना अभिवादन करून महिलांच्या खुल्या कबड्डी स्पर्धाचे उदघाटन करण्यात आले.
या महिला कबड्डी स्पर्धेत सावित्री संघाने पहिला क्रमांक पटकावला पाच हजार रुपये मेडल व प्रमाणपत्र व ट्रॉफी देण्यात आले तर द्वितीय संगम राडी तांडा संघाने तीन हजार रुपये मेडल व प्रमाणपत्र,व ट्रॉफी देण्यात आले आणि तिसरे बक्षीस सखी संघ अंबाजोगाई ने दोन हजार रुपये मेडल प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले .
या स्पर्धेसाठी एकूण आठ संघ कबड्डी स्पर्धेत उतरले व महिलांनी मोठ्या उत्साहात या स्पर्धेत खेळ खेळल्या
या कार्यक्रमाचे उद्धघाटक लाभलेल्या मानवलोक च्या मा. कल्पना ताई लोहिया, मा. अनिकेत (भैय्या) लोहिया,.मा.सविता पाटील- कबड्डी खेळाडू महिला समुपदेशक- मा. जयश्री मोले, कोरो इंडिया च्या विनया घेवदे, एकल महिला संघटनाच्या महानंदा चव्हाण, रुक्मिणी नागापुरे, अनिता नवले, भाग्यश्री रणदिवे, प्रजावती जोगदंड यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. तर एकल महिला संघटना च्या भाग्यश्री रणदिवे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमात प्रजावती ताईचे अनिकेत भैय्या यांनी खुप कौतुक करत त्यांना सन्मानित केले व शुभेच्छा दिल्या याबरोबरच नौशाद सय्यद, आम्रपाली तिगोटे, दीपक निकाळजे सर, यांच्या सह सर्व mrm टीम उपस्थित होती, तसे या कार्यक्रमाची तयारी एकल महिला संघटना ता. सचिव प्रजावती जोगदंड, वर्षा मस्के, उज्वला खंडागळे, आम्रपाली कांबळे,यांनी परिश्रम घेतले तर मानवलोक चे सर्व टीम यांचे मोलाचे सहकार्य लाभले, तालुक्यातील लिडर्स महिला व मुली मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा