बसमध्ये पैसे चोरणाऱ्या चार महिलांना प्रवाशांनी दिले पोलिसांच्या ताब्यात 

केज :- अहमदपूरहून छत्रपती संभाजीनगरकडे निघालेल्या बसमध्ये एका वृद्धाचे १० हजार रुपये बॅगमधून चार अनोळखी महिलांनी काढून घेतले. हे लक्षात येताच प्रवाशांना बसमधील प्रवाशांना संशय आला. त्यामुळे केज येथील बसस्थानकात बस घेऊन न जाता चालक व वाहकाने बस थेट पोलीस ठाण्यात घेवून आले. त्यानंतर प्रवाशांनी या चार महिलांना पोलिसांकडे सुपूर्द केले.

या बाबतची माहिती अशी की, दि. २६ मार्च रोजी दुपारी १२:४५ वाजण्याच्या सुमारास अहमदपूर एसटी बस आगाराची अहमदपूर - छत्रपती संभाजीनगर (एम. एच.१४ बी.टी.१३६०) ही बस बुधवारी दुपारी अहमदपूरहून छत्रपती संभाजी नगरकडे निघाली. अंबाजोगाई येथून प्रवासी घेऊन केजकडे येणाऱ्या या बसमध्ये होळ येथून वृद्ध नागरिक नरहरी घुगे हे केजला न्यायालयीन कामासाठी येत होते. बसमध्ये अगोदर असलेल्या चार महिलां पैकी दोन महिलांनी त्यांना त्यांच्या शेजारी जागा दिली. सीटवर दाटी करून त्या महिलांनी त्यांच्या बॅग मधील १० हजार रुपये काढून घेतले. बस चंदनसावरगाव जवळ आल्या नंतर घुगे यांना त्यांच्या बॅगमधील १० हजाराची रक्कम चोरीला गेल्याचे दिसून आल्याने त्यांनी आरडा ओरडा करीत महिलांकडे विचारपूस केली. त्यानंतर या महिलांनी ही रक्कम सीटखाली टाकली. त्यानंतर बसच्या वाहक-चालकांनी बस ही येथील बस स्थानकात न थांबता बस थेट केज पोलीस ठाण्यात आणली. त्यामुळे त्या चार संशयित महिलांना पळून जाण्याची संधी मिळाली नाही. केज पोलीस ठाण्यात बस आणून चार महिलांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. नरहरी घुगे यांनी चार महिलां विरुद्ध पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला आहे. पोलिसांनी कसून चौकशी केल्यास पैसे आणि दागिने चोरीच्या अनेक घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार