गरजवंतानी शिवसेने कडे वधू वरांची नोंदणी करावी

 शिवजयंती निमित्त शिवसेनेच्या वतीने हिंदु धर्मिय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन: व्यंकटेश शिंदे 

गरजवंतानी शिवसेने कडे वधू वरांची नोंदणी करावी


परळी (प्रतिनिधी): अखंड हिंदुस्थान चे आराध्या दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक, जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंती निमित्त प्रती वर्षी प्रमाणे या ही वर्षी शिवसेनेच्या  वतीने हिंदु धर्मिय सामुदायिक विवाह सोहळ्याचे  आयोजन करण्यात आले आहे. गरजवंतानी शिवसेने कडे वधू वरांची नोंदनी करावी असे आवाहन शिवसेना तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे यांनी केले आहे. 

     परळी तालुका शिवसेनेच्या वतीने  शिवसेना तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे यांच्या संकल्पनेतून प्रतिवर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त हिंदू धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या जल्लोषात करण्यात येतो. परळी तालुक्यातील शेतकरी, कामगार, कष्टकरी, ऊसतोड मजूर अशा गरजवंत कुटुंबातील मुलींचे सामुदायिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून कन्यादान करण्याचे पवित्र कार्य शिवसेनेच्या वतीने करण्यात येते. आज पर्यंत या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून  मोठा भाऊ या नात्याने शेकडो मुलीच्या विवाहाचा खर्च उचलून वधू पित्याला आधार देण्याचं काम शिवसेना करत आली आहे. या वर्षी होणाऱ्या विवाह सोहळ्या साठी गरजवंतानी ९६५७४४०४४४, ९४०४७०७७७७, ९४०४७०७५५५ , ९४०४०८५५७९ या क्रमंकावर संपर्क साधून नोंदणी करावी असे आवाहन परळी तालुका शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !