सदेह वैकुंठगमन सोहळा ठरला नेत्रदीपक

 तुकाराम तुकाराम नाम घोषाने देहूनगरी गेली दुमदुमून 

सदेह वैकुंठगमन सोहळा ठरला नेत्रदीपक

----------------------------------

 ✍️ बब्रुवान.ज.शेंडगे पाटील,

    (संस्थापक अध्यक्ष जगद्गुरु तुकाराम महाराज सामाजिक अध्यात्मिक प्रतिष्ठान) 

----------------------------------

यावर्षीची बीज जगद्गुरु तुकाराम महाराज यांना 375 वर्षे पूर्ण झाल्याने विविध कार्यक्रमांनी देहू नगरीमध्ये साजरी झाली. 375 वर्षांनी पुन्हा एकदा भंडारा डोंगराची अनुभूती आली. सदेह वैकुंठ गमनाचे औचित्य साधून भंडारा डोंगर येथे या कार्यक्रमाचे निमंत्रण ह भ प ज्ञानोबा माऊली कदम यांच्या नेतृत्वाखाली दिनांक आठ तीन 2025 ते 17 3 2025 या कालावधीमध्ये भव्य दिव्य गाथा पारायण सोहळा अखंड हरिनाम सप्ताह   जगद्गुरु तुकाराम महाराज चरित्र कथा व महाराष्ट्रातील ख्यात किर्त कीर्तनकारांची सेवा संपन्न झाली.

       या अनुपम्य सोहळ्याचे साक्षीदार होण्याची भाग्य आम्हाला याची देही याची डोळा पहावयास मिळाली या कार्यक्रमाच्या संदर्भात हा शब्द प्रपंच आपल्या लोकप्रिय दैनिकासाठी करीत आहे प्रचंड भाविकांचा सहभाग 24 तास तुकाराम तुकाराम जप यासह दररोज येणाऱ्या हजारो भाविकांना महाप्रसाद आणि महाप्रसादासाठी राज्यभरातून झालेले अन्नदान अशा पद्धतीने हजारो हातांच्या सहकार्याने श्रीक्षेत्र भंडारा डोंगर पायथ्याला झालेला त्रिशतकोत्त्र सदैव वैकुंठ गमन सोहळा 375 वर्षांनी पुन्हा एकदा खऱ्याअर्थाने भंडारा डोंगराची अनुभूती दाखवून गेला संत तुकाराम महाराज यांच्या सदैह वैकुंठ गमनाला 375 वर्षे पूर्ण झाली भंडारा डोंगरावर महाराजांच्या मंदिराचे काम सुरू आहे मंदिर उभारणीला भरघोस मदत प्राप्ती व्हावी या उद्देशाने ह भ प ज्ञानेश्वर महाराज कदम यांनी भव्य पारायण सोहळा आयोजित करण्याची संकल्पना मांडली शांती ब्रह्म मारुती महाराज कुरेकर यांची खंबीर साथ आणि आशीर्वाद तसेच महाराष्ट्रातील अनेक नामांकित कीर्तनकार यांच्या उपस्थितीत पारायण सोहळा यशस्वी झाला. 


अन्नदानाचा विक्रम..... 

सप्ताह काळात भाविकांचा महाप्रसादासाठी आगळे वेगळे नियोजन करण्यात आले होते होळीच्या दिवशी पाच लाख पुरणपोळ्या तसेच आमटी भजी कुरडई असा महाप्रसाद मुळशी तालुक्यातील शेतकरी माय भगिनींनी पाठवला त्याचबरोबर 4000 लिटर दूधही देण्यात आली तसेच जळगाव व धुळे तालुक्यातून तीन लाख मांड्याचा महाप्रसाद आला उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथून 375 किलो तुपाचे डबे आमदार शंकर जगताप यांचे बंधू विजय जगताप यांच्या सहकार्याने आणण्यात आली याशिवाय अनेकांनी मोठ्या संख्येने तेलाचे व तुपाचे डबे आणून दिले मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात तांदूळ दिले अशा प्रकारचे आणखीन चार सोहळे होतील इतके तांदूळ उपलब्ध झाले जिल्हाभरातून गावागावातून रोजच्या भाकऱ्या लाखोच्या संख्येने आल्या. 



 

भंडारासह इतर देवस्थानांना निधी...

केवळ घोंगडी घेऊन आले व घोंगडी घेऊन गेले अशा निस्वार्थ हेतूने छोटे माऊली आले व सेवा कार्य बजावून परत निघून गेले जाता जाता पुढे ज्ञानेश्वर माऊलींच्या 750 व्या समाधी सोहळ्या निमित्त होणाऱ्या सप्ताहासाठी 5 लाख देहू संस्थांसाठी 1 लाख घोरावेश्वर संस्थांसाठी एक लाख भामचंद्र संस्थांसाठी एक लाख परमपूज्य कुरेकर बाबांच्या आरोग्य खर्चासाठी एक लाख असा सर्व निधी सुपूर्द करून गेले व अन्नदानातील पूर्व वीत किराणा व इतर साहित्य व निधी अशी 2 कोटी पर्यंत ची मदत त्यांनी भंडारा डोंगर समितीकडे सुपूर्त केली.

भंडारा डोंगर आख्यायिकेची प्रचिती:-

छत्रपती शिवाजी महाराज एकदा मावळ प्रांतातून जात असताना भंडारा डोंगराच्या पायथ्याला आली होते संत तुकाराम महाराजांची दर्शन घेण्यासाठी ते डोंगरावर गेले त्यांच्यासोबत शेकडो मावळे होते छत्रपतींना समोर पाहतात संत तुकोबारायांनी त्यांना जेवणाचा आग्रह केला पत्नी जिजाबाईंनी दोघांना पुरेल एवढीच शिदोरी आणली होती परंतु चमत्कार असा झाला त्या शिदोरीतील भाकरी छत्रपती शिवाजी महाराज सर्व मावळ्यांनी घेऊनही संपली नाही तेव्हापासून या  डोंगराला भंडारा डोंगर असे नाव पडले.

      ✍️ बब्रुवान.ज.शेंडगे पाटील,

    (संस्थापक अध्यक्ष जगद्गुरु तुकाराम महाराज सामाजिक अध्यात्मिक प्रतिष्ठान)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार