ग्रामदूत जलसाक्षरता प्रशिक्षण वर्ग....

 गावातील पाणलोट विकासामध्ये ग्रामदूतांची भूमिका महत्त्वाची- किरणकुमार गित्ते 

 अंबाजोगाई (प्रतिनिधी) 

      मानवलोक अंबाजोगाई व विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटी परळी वैजनाथ, ग्राम सुराज्य फाऊंडेशन आणि जल साक्षरता केंद्र मानवलोक समाजकार्य महाविद्यालय अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यामाने ग्रामदूत जलसाक्षरता प्रशिक्षण वर्ग चे उद्घाटक  किरण गित्ते (सचिव: नगर विकास ,सार्वजनिक बांधकाम, आरोग्य ,उद्योग ,पर्यटन विभाग त्रिपुरा सरकार),विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीच्या अध्यक्षा उषा किरण गित्ते  यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी गित्त यांनी महाराष्ट्रातील पाणलोट चळवळ मधील सी एस आर चे योगदान आणि ग्रामीण पातळीवरील विकासामधील स्वयंसेवी संस्थांची भूमिका याविषयी मार्गदर्शन केले तसेच त्यांनी ग्राम दूध हा गावातील पाणलोट चा कणा आहे ग्रामदूतानी गावांमध्ये जाऊन आपल्या आपल्या गावातील पाणलोट क्षेत्र वाढवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री लालासाहेब आगळे यांनी गावातील पाणलोट चळवळ आणि गाव विकास कसा केला जातो तसेच पाणलोट चळवळी च्या माध्यमातून गावातील लोकांना जलसाक्षर करणे अत्यंत आवश्यक आहे. जल साक्षर झालेल्या लोकांनी पाणलोट विकास मध्ये आपले योगदान देणे गरजेचे आहे याविषयी मार्गदर्शन केले.

   या प्रशिक्षण वर्गास बीड जिल्ह्यासह संभाजीनगर, जालना,लातूर जिल्ह्याचे  गाव प्रतिनिधी उपस्थित आहेत.दोन दिवस चालणाऱ्या प्रशिक्षण वर्गात भूजल,पाणलोट,शाश्वत शेती व लोकसहभाग , गावकार्यकर्त्याची भूमिका या विषयी विविध तज्ञांनी मार्गदर्शन केले. यामध्ये श्री लालासाहेब आगळे डॉ. श्रीनिवास वडपाळकर, डॉ. सोमीनाथ घोळवे, श्री प्रकाश गडदे ,श्री समीर पठाण यांनी आपापल्या विषयावर मार्गदर्शन केले.

समारोप प्रसंगी श्री डॉ. सुहास आजगावकर यांनी गाव पातळीवरील पाण्याचे नियोजन व महिला चे प्रश्न याविषयी तसेच त्यांनी केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ प्रकाश जाधव यांनी एकूण पाणलोट विकास साधायचा असेल तर ग्राम चळवळ केली पाहिजे आणि उपस्थित सर्व जलदूतांनी आपल्या गावापातळीवर पाणलोटाचे प्रयोग केले पाहिजेत असे मत व्यक्त केले.

        कार्यक्रमासाठी मराठवाड्यातील विविध गावातील सहभागी तसेच एम एस डब्ल्यू महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ हनुमंत साळुंके सर यांनी केले तर आभार श्री. प्रकाश चोले यांनी मांडले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !