धसांच्या 'खोक्याने' जाहीर कार्यक्रमात दिली होती विद्यार्थ्यांना हात - पाय मोडून टाकण्याची धमकी..
प्राचार्य, शिक्षक देखील होते उपस्थित
बीड, : शिरूर येथील सतीश भोसले यांचे नवनवे कारनामे समोर येत असून यादरम्यान आता एका व्हिडिओ मध्ये तो विद्यार्थ्यांना हात पाय मोडण्याची धमकी देत असल्याचे दिसते. तसेच आधीच माझ्यावर खूप सार्या केसेस आहेत आणखी काही केसेस झाल्याने काही फरक पडत नाही असे देखील म्हणत असल्याचे दिसतो. हा व्हिडिओ शिरूर येथीलच कालिकादेवी विद्यालयातील असल्याचे समोर आले असून यामध्ये प्राचार्य व शिक्षक उपस्थित असल्याचे दिसते.. प्राचार्य व शिक्षकांनी अशा व्यक्तीला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला कसे काय बोलावले असेल असा प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.
शिरूर तालुक्यातील सतीश भोसले यांनी एका व्यक्तीला बॅटने मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आला होता. त्यानंतर ढाकणे पिता पुत्राला देखील अमानुष मारण करत जखमी केले होते. या दोन्ही प्रकरणात गुन्हा दाखल झाला असून सतीश भोसले यांचे स्वतः पोलिसांची दोन पथके रवाना झाले आहेत. यादरम्यानच आता सतीश भोसले चा एक नवा व्हिडिओ समोर आला असून यामध्ये तो शाळेत असलेल्या विद्यार्थ्यांना हातपाय मोडण्याची धमकी देत असल्याचे दिसते. कार्यक्रमात हा सगळा प्रकार सुरू असून यावेळी संबंधित विद्यालयाचे प्राचार्य शिक्षक देखील उपस्थित असल्याचे व्हिडिओमध्ये दिसते. अशा प्रकारच्या गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तीला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला कस काय बोलावले असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा