मुला बाळांना सोडून जोडपे झाले सैराट
दोन लेकरांची आई एका मुलाच्या बापा सोबत पळाली !
मुला बाळांना सोडून जोडपे झाले सैराट
केज :- प्रेमाला वय आणि बंधन नसते. असे म्हणतात पण मनाची नसेल तरी जनाची हवी ! केज शहातून एक जोडपे फरार झाले असून त्यातील दोघेही विवाहित आहेत. त्या महिलेला दोन मुले आणि त्याला एक मूल असताना दोघांनी आपल्या कुटुंबाचा किंवा मुला बाळांचा विचार न करता एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेली जोडप्यांनी धूम ठोकली. या बाबत केज पोलीस ठाण्यात ते दोघे हरवल्याची वेगवेगळी तक्रार दाखल झाली आहे.
केज शहरात राहत असलेली २५ वर्षीय तरुणी आणि २९ वर्षाचा तरुण यांचे एकमेकांवर प्रेम होते. मात्र ते दोघेही विवाहित असून त्या तरुणीला तिच्या पती पासून दोन मुले आहेत तर. तिचा प्रियकर सुद्धा विवाहित असून त्यालाही एक मूल आहे. मात्र एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या जोडप्यांनी आपापल्या मुलांचा विचार न करता सोबत धूम ठोकून पळून गेले आहेत. या सैराट प्रकरणाची चर्चा शहरात सुरू आहे. मात्र यामुळे दोन्ही कुटुंब उद्ध्वस्त होवू शकतात याची दोघांनी का जाणीव झाली नसावी ?
दोघांच्या कुटुंबातील लोकांनी केज पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यामुळे आता केज पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक वैभव पाटील हे त्या सैराट जोडप्याचा शोध घेत असून लवकरच त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलीस रवाना झाले असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा