लढा न्यायाचा....व्यथा आश्रमशाळेतील शिक्षकांची...

 शाहु-फुले-आंबेडकर आश्रमशाळांना वेतनश्रेणी लागू करुन १०० टक्के अनुदान द्या !

अनुदान द्या; शिक्षकांच्या आत्महत्या थांबवा, बीडमध्ये आमरण उपोषण


बीड, प्रतिनिधी:- राज्यातील फुले, शाहू, आंबेडकर निवासी अनुसूचित जातीच्या आश्रम शाळांना व्हीजेएनटी  संहितेप्रमाणे वेतनश्रेणी लागू करून शंभर टक्के अनुदान तात्काळ देण्यात यावे यासह अन्य मागण्यासाठी आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर फुले शाहू आंबेडकर अनुसूचित जाती आश्रम शाळा शिक्षक कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य बीड जिल्ह्याच्या वतीने आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे.


        फुले, शाहू, आंबेडकर अनुसूचित जाती आश्रम शाळा शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या वतीने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत. या उपोषणास्थळी शेकडो शिक्षक कर्मचारी दाखल झाले आहेत. यामध्ये स्वर्गीय धनंजय अभिमान नागरगोजे यांच्या कुटुंबास ५० लक्ष रुपये तात्काळ मदत देण्यात यावी,त्यांच्या पत्नी राजकन्या धनंजय नागरगोजे यांना शासकीय सेवेत घेण्यात यावे व राज्यातील  शाहू फुले आंबेडकर निवासी अनुसूचित जातीच्या आश्रम शाळांना व्हीजेएनटी संहितेनुसार वेतनश्रेणी प्रमाणे शंभर टक्के अनुदान देण्यात यावे. यासह अन्य मागण्यासाठी सदरील आमरण उपोषण केले जात आहे. या आमरण उपोषणाच्या आंदोलनात शेकडो शिक्षकांसह कर्मचारी यांनी सहभाग घेतला आहे. तर शासनाने या आंदोलनाची दखल न घेतल्यास शिक्षक कुंटुब देखील सहभागी होणार आहेत.







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !