महिला पालकांनी आपल्या पाल्याच्या परिपूर्ण व्यक्तिमत्व जडणघडणीसाठी अगोदर स्वतःमध्ये बदल करून घ्यावेत !
परळी वैजनाथ.......
महिला पालकांनी आपल्या पाल्याच्या परिपूर्ण व्यक्तिमत्व जडणघडणीसाठी अगोदर स्वतःमध्ये बदल करून घ्यावेत असा महत्त्वपूर्ण संदेश डॉ दैवशाला घुगे मॅडम यांनी स्कॉलर केजी स्कूलमध्ये आयोजित महिला दिनाच्या कार्यक्रमानिमित्त जमलेल्या महिला पालकांना दिला.
स्कॉलर केजी स्कूलमध्ये प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावर डॉ दैवशाला घुगे व डॉ कल्पना गित्ते यांच्यासह सौ शोभा फुटके उपस्थित होत्या.
सर्वप्रथम पाहुण्यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपपज्वलन करण्यात आले. पाहुण्यांचे स्वागत झाल्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या प्राचार्या सौ सुजाता फुटके यांनी केले.
डॉ दैवशाला घुगे पुढे बोलताना म्हणाल्या की, सुसंस्कारित पिढी घडवण्यासाठी महिलांची जबाबदारी मोठी असते. फुटके परिवाराने आपले लेकींवर उत्तम संस्कार केलेले आहेत आणि आता त्या विविध ठिकाणी पदे भूषवत आहेत. शाळेच्या माध्यमातून ते संस्कार तुमच्या पर्यंत नक्कीच पोहोचतील.
डॉ कल्पना गित्ते यांनी आपल्या भाषणात महिलांना परिवारातील सर्व सदस्यांची काळजी घेत असताना स्वतःकडेही लक्ष देण्याचा सल्ला दिला.
ओलंपियाड परीक्षेतील विद्यार्थ्यांचे सत्कार
आंतरराष्ट्रीय ऑलिपियाड स्पर्धेत शाळेच्या सात विद्यार्थ्यांनी विविध विषयात प्रावीण्य मिळवले असून अशा विद्यार्थ्यांचा सन्मान प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन करण्यात आला. यामध्ये राजलक्ष्मी गुट्टे, ओवी गायकवाड, काव्या शंकुरवार, आराध्या रोकडे, सौम्या नव्हाडे, शिवांश मालेवार, पद्माक्ष व्यवहारे यांचा समावेश होता.
महिला पालकांसाठी विरंगुळा
रोजच्या धावपळीतून थोडासा आनंदाचा क्षण मिळावा म्हणून महिला पालकांसाठी शाळेच्या वतीने छोट्या खेळाचे आयोजन करण्यात आले होते आणि या खेळांमध्ये जिंकलेल्या महिला पालकांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. या खेळामध्ये महिलांनी मोठ्या आनंदाने सहभाग घेतला होता.
शाळेच्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका श्रीमती प्रमिला कदम यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती वर्षा लाड यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या शिक्षिका संगीता रोकडे, राजश्री हलकांचे, भाग्यशाली शिंदे, ज्योती वळसे तसेच कर्मचारी सुनेना गुट्टे व अश्विनी मुंडे यांनी परिश्रम घेतले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा