प्राचार्य आबासाहेब हांगे यांना उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार प्रदान 

अमोल जोशी  / पाटोदा - येथील नवगण शिक्षण संस्था संचालित वसंतदादा पाटील कला, वाणिज्य  व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर आबासाहेब हांगे यांना नुकताच महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असणाऱ्या करिअर कट्टा उपक्रमाअंतर्गत बीड जिल्हा पातळीवरील उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार घोषित करण्यात आला होता.


१८ मार्च रोजी छत्रपती संभाजीनगर विभागाचा विभागीय पुरस्कार वितरण सोहळा देवगिरी महाविद्यालयात थाटात संपन्न झाला. याच सोहळ्यात प्राचार्य आबासाहेब हांगे यांना सदरील पुरस्काराचे वितरण करून गौरविण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे, देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर तेजनकर, करिअर कट्टा बीड जिल्हा प्रमुख प्राचार्य प्रोफेसर  विधाते, पुण्याच्या मॉडर्न कॉलेजचे प्राचार्य प्रोफेसर मदने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !