शालेय विद्यार्थिनीचा विशेष लेख >>>>>
नाव मोठे लक्षण खोटे!
तुमचं नाव मोठं आहे का ? माझं तर नाहीये. माझं नाव फक्त पाच अक्षरांचे 'कोमल' म्हणजे इंग्लिश मध्ये फक्त five letters! माझ्या मैत्रिणींचे नावे खूप मोठी आहेत जसं की ,चैतन्या ,वैष्णवी त्यांच्या इंग्लिश मध्ये मोठ्या स्पेलिंग्स आहेत ,म्हणजे त्यांचं नाव मोठं आहे. असं असतं का?
असं नसतं! नाव मोठं म्हणजे साऱ्या गावात, साऱ्या जगात, त्यांची ओळख आहे, त्यांचा आदर्श आहे, त्यांना सर्व ओळखतात त्याचे नाव मोठे! आता आपल्याला माहिती नाहीये; पण बिझनेसच्या संदर्भात जे अभ्यास करत असतात त्यांना माहिती आहे की बिझनेस मध्ये कोण जगात बेस्ट आहे, कोण नाही.... म्हणजे, मुळात जो व्यक्ती यशस्वी झालाय आणि आता त्याला सर्व ओळखतात म्हणजे जगात तो बेस्ट आहे तसे त्या व्यक्तीचे नाव मोठे आहे. त्या व्यक्तीने खूप नाव कमावले आहे.
आत्ता मला सांगा तुमचं नाव मोठे आहे का? आजच्या काळात सर्वांना पॉप्युलर व्हायचे आहे.... सर्वांना लोकप्रिय व्हायचे आहे, म्हणजेच सर्वांना नाव कमवायचे... पण असं का हो?
केवळ नाव कमावण्यासाठी मोठे होऊ नका. आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, आपली ड्रीम पूर्ण करण्यासाठी, आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत करा आणि यशस्वी व्हा! इतिहासात नाव तर छत्रपती संभाजी महाराज यांना मारणाऱ्यांचे पण आले....इतिहासात नाव तर महात्मा गांधी यांची हत्या करणाराचे पण आले.... इतिहासात नाव तर आपल्या भारतावर हुकूमशाही करणारांचे म्हणजेच ब्रिटिशांचे पण आले.... यांनी तर काही चांगले काम केले नाही; पण तरीही त्यांचं नाव इतिहासात आहे म्हणजे ते चांगले आहेत का ? असं नसतं !
आपण फक्त छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, सावित्रीबाई फुले यांसारख्या थोर महात्म्यांचीच का जयंती साजरी करतो? इतिहासात नाव तर त्यांच्याविरोधकांचे पण आले होते ना! त्यांची का जयंती साजरी करत नाहीत? कारण लोकांना माहितीये कोणी आपल्यासाठी काय केलं, केवळ इतिहासात नाव आल्याने किंवा किंवा पेपरामध्ये आपले नाव आल्याने आपण चांगले ठरत नाहीत. कुप्रसिद्धी आणि सुप्रसिद्धी यातला फरक असतो यात!
इतिहासात चांगल्या गोष्टीसाठीच आपण काम केल्याचं नाव यायला हवं... फक्त आपला स्वभाव चांगला असायला पाहिजे. ना की नाव कमवण्यासाठी उगीचच पेपरात मी ते केलं म्हणजे, आजच्या काळात लोक गरिबांची मदत करतात आणि पेपर मध्ये बातमी देतात! या या अमुक अमुक व्यक्तीने गरिबांची मदत केली! ते फक्त पेपर मध्ये बातमी देण्यापुरतच! असं नका करू! मदत करायचीच आहे तर नीट करा youtube वर व्हिडिओ वायरल करून किंवा पेपर मध्ये बातमी देऊन मी यांची मदत केली असं गाजवण्यापेक्षा एखाद्या व्यक्तीची मनापासून मदत करा ...तुमचं नाव आपोआप जगाला कळेल! त्याच्यामुळे नाव कमवण्याच्या मागे लागू नका आपली स्वप्न पूर्ण करा.
'नाव मोठे आणि लक्षण खोटे ',अशी एक म्हण आहे तुम्हाला माहितीच असेल, अशी म्हण तुम्हाला लागू होईल असं वागू नका. करायचं आहे तर मनापासून करा. नाव कमवण्यासाठी उगाचच मदत केली असं जगात गाजवून सांगू नका. बाकी तुम्ही हुशार आहात तुम्हाला जितकं समजायचं तितकं तुम्ही समजलात, धन्यवाद!
✍️ कु. कोमल कृष्णा गुट्टे
वर्ग ८ वा
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी, केंद्र मिरवट, तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड.
खूपच छान विचार मांडलेत कोमल. अभिनंदन
उत्तर द्याहटवालिखाणात वास्तवता आहे रमाबाई आंबेडकर नाव ॲड करा
उत्तर द्याहटवा