आपघात.....
आपघात:मोटरसायकल - आयशर धडकेत युवक ठार
माजलगाव दि.१२(प्रतिनिधी)
तालुक्यातील पिंपळगाव शिवारात माजलगाव गडी रोडवर मोटरसायकल व आयशरची समोरासमोर धडकून २६ वर्षीय युवक ठार झाल्याची घटना बुधवारी ६ वाजण्याच्या सुमारास घडली.
तालुक्यातील सुर्डी नजिक तांडा येथील रहिवासी असलेला गोपाळ रूपसिंग पवार हा युवक माजलगाव शहरापासून जवळच असलेल्या ब्रह्मगाव येथुन आपल्या मित्राला भेटून आपल्या गावी सुर्डीला जात होता. केसापुरी वसाहत जवळ असलेल्या सौभाग्य मंगल कार्यालयासमोर समोर आयशरला धडक झाल्याने हा युवक जागीच पडल्याने त्याच्या डोक्याला जबर मार लागून त्याचा मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
या युवकास जवळच असलेल्या नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. गोपाळ पवार यास पत्नी,एक मुलगा, आई वडील असा परिवार आहे. त्याच्या झालेल्या अपघाती मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा