बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने इफ्तार पार्टी उत्साहात
परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटना (लाल बावटा) च्या वतिने बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने 24 मार्च रोजी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. अतिशय उत्साहात ही इफ्तार पार्टी संपन्न झाली.
इफ्तार पार्टीसाठी सर्व बांधकाम कामगारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. बांधकाम कामगारांत बंधुभाव वाढवा यासाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रा. बी.जी खाडे हे मागील चार वर्षापासून इफ्तार पार्टीचे आयोजन करत आहेत.इफ्तार पार्टीचे यशस्वी आयोजन करण्यासाठी संघटनेचे सरचिटणीस जालिंदर गिरी, शेख जावेद, शेख अजहर, नविद मौजन, प्रकाश वाघमारे, लक्ष्मीबाई कलिंदर यांनी मेहनत घेतली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा