सकल हिंदू समाज रस्त्यावर उतरताच प्रशासन खडबडून जागे: अवैध कत्तलखाना लगेचच होणार सील!
पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडेंच्या मध्यस्थीनंतर गोरक्षकांचे आमरण उपोषण स्थगित
परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
गेल्या सहा दिवसापासून परळी नगर परिषदेसमोर तीन गोरक्षकांनी गोहत्या बंदी करावी, परळीतील अवैध कत्तलखाना बंद करावा यासह अन्य सहा मागणीसाठी अमर उपोषण सुरू केले होते. प्रशासन या उपोषणाकडे उदासीनतेने बघत असतानाच आज सकाळी परळी शहरातील सकल हिंदू समाजाच्या वतीने प्रचंड संख्येने मूक मोर्चा काढत या उपोषणाला पाठिंबा दर्शविला. यावेळी प्रशासनाला खडबडून जाग आल्याचे बघायला मिळाले. त्याचप्रमाणे राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनीही प्रशासनाला कडक निर्देश देत उपोषणकर्त्यांच्या भावना ऐकून घेतल्या. उपोषणकर्त्यांशी संवाद साधत योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन देऊन उपोषण सोडण्याची विनंती केल्यानंतर हे उपोषण आता स्थगित करण्यात आले आहे. नगरपरिषद प्रशासन तातडीने अवैध कत्तलखाना आजचे आजच सील करणार असल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
परळी शहरातील कत्तलखाने बंद करण्याची मागणी उपोषणाच्या माध्यमातून करण्यात येतेय. मागील 6 दिवसांपासून नगरपालिके समोर हे बेमुदत उपोषण सुरु होते.प्रशासनाने या उपोषणाची दखल घेतली नसल्यामुळे सकल हिंदू समाजाच्या वतीने परळी नगर परिषदेवर भव्य मूक मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा शहरातील राणी लक्ष्मीबाई टावर चौक येथून काढण्यात आला.या मोर्चामध्ये हातामध्ये भगवे झेंडे घेऊन व विविधव घोषवाक्यांचे फलक हातात घेऊन हा मोर्चा परळी नगर परिषदेवर धडकला. यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या मूक मोर्चा मध्ये वारकरी, महिला, पुरुष, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांना निर्देशित केले.तसेच उपोषणकर्त्यांचे समाधान करुन उपोषण सोडवले. उपोषणर्त्यांची प्रकृती खालावलेली असुन उपोषण स्थगित करण्यात आल्यानंतर त्यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
नगर परिषद मुख्याधिकाऱ्यानी काय दिले लेखी अश्वासन?....
१. परळी शहरातील मुख्य रस्त्यावरील व उघड्यावरील मांस विक्री बंद करणे बाबत या कार्यालयामार्फत स्थानिक वृत्तपत्रात जाहिर आवाहन प्रसिध्द करण्यात आले आहे.
2. परळी शहरातील कत्तलखाना बंद असलेले वावत पत्र देवून आपणास कळविण्यात आले आहे.
3. परळी शहरातील मुख्य रस्त्यावरील व उघड्यावरील मांस विक्री बंद करणे बाबत ध्वनीक्षेपणाद्वारे सुचना देण्यात आलेल्या आहेत.
4. परळी शहरातील मुख्य रस्त्यावरील व उघड्यावरील मांस विक्री करणा-यांना नोटीस तामिल करण्यात आलेल्या आहेत.
5. परळी शहरातील कत्तलखाना आज दिनांक 08.03.2025 रोजी लोखंडी पत्र्यांनी बंद करण्यात येईल. जेणे करून त्याठिकाणी कोणताही अनुचित प्रकार होणार नाही. तथापि सदरील कत्तलखाना पाडण्यात यावा किवा कसे याबाबतचा स्ट्रक्चरल ऑडीट रिपोर्ट मागविण्यात येत असून या कार्यालयास साधारणतः दिनांक 12.03.2025 रोजी पर्यंत स्ट्रक्चरल ऑडीट रिपोर्ट प्राप्त होईल स्ट्रक्चरल ऑडीट रिपोर्ट नुसार कार्यवाही करण्यात येईल.
● संपूर्ण video पहा:-
https://www.youtube.com/live/fH8U68BxoF4?si=xVu57PxMUBZfFRa
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा