रमजानच्या माध्यमातुन सर्वच जाती धर्मातील लोकांना चांगला संदेश देण्याची आपणाला संधी मिळते -भाई विष्णुपंत घोलप
अमोल जोशी /पाटोदा
भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने मंगळवार दि.25/3/2025 रोजी रोजा ईफ्तार पार्टीचे आयोजन दर्गा मज्जिद,राज महमंद चौक ता.पाटोदा येथे करण्यात आले होते त्यावेळी रोजा ईफ्तार पार्टीचे आयोजक शेकापचे जिल्हा चिटणीस भाई विष्णुपंत घोलप यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात रमजान महिना हा मानवाच्या मनातील वाढलेली दरी कमी करण्यासाठी तसेच परस्परामध्ये स्नेह भाव वाढविणारा हा पवित्र महिना असुन या रमजान महिन्यात मानवाला संयम,शांतता, त्यागाची भावना,माणसाचा चांगुलपणा दाखविण्याचा तसेच उपवासाच्या माध्यमातुन संयमाबरोबर आपल्या आत्म्याला शुध्द करण्याचा देखील संदेश रमजानच्या माध्यमातुन मानवाला देण्यात आलेला आहे.रमजानच्या पवित्र महिन्यात आपल्याकडुन झालेल्या चुकीला क्षमा मागण्याचा व इतरावर दया करण्याचा आणि दान धर्म करुन श्रध्देने प्रार्थना करुन अल्लाहाकडे(परमेश्वराकडे) सर्वांसाठी दुवा मागितला जातो. या रोजा ईफ्तार पार्टीला हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा