वसंतदादा पाटील महाविद्यालयात अतिथी व्याख्यान उत्साहात 

अमोल जोशी / पाटोदा - येथील नवगण शिक्षण संस्था संचालित वसंतदादा पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात २१ मार्च रोजी शारीरिक शिक्षण विभागामार्फत अतिथी व्याख्यान संपन्न झाले.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रोफेसर आबासाहेब हांगे होते. प्रमुख अतिथी म्हणून शिरूर कासारच्या कालिकादेवी महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. राजेश क्षीरसागर, बीडच्या सौ. केएसके महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. भागचंद सानप उपस्थित होते. व्यासपीठावर कमवि उपप्राचार्य प्रा. नामदेव चांगण, पर्यवेक्षक प्रा. अनिल जोगदंड, शारीरिक शिक्षण विभागप्रमुख डॉ. विनोदचंद्र पवार उपस्थित होते.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अतिथी व्याख्यात्यांचा परिचय डॉ. विनोदचंद्र पवार यांनी करून दिला.  'शारीरिक शिक्षणाचे मानवी जीवनातील महत्व' या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. भागचंद सानप यांनी प्राचीन काळापासून आजपर्यंत शारीरिक शिक्षण मानवी जीवनाशी कसे निगडित आहे व इतर सर्व विषयांचा शारीरिक शिक्षण विषयाशी कसा परस्पर सहसंबंध आहे हे सविस्तर विषद केले.


अध्यक्षीय समारोपात प्राचार्य आबासाहेब हांगे म्हणाले की शारीरिक शिक्षण विषयाच्या अध्ययनाने व सातत्यपूर्ण सरावाने निरोगी शरीरात निकोप मन व मस्तिष्क विकसित होण्यास मदत होते.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. कुशाबा साळुंके यांनी केले. आभारप्रदर्शन प्रा. गणेश देशमाने यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार