उद्या दुपारपर्यंत बाजारपेठ बंद ठेवणार: गोरक्षण सेवा संघाच्या आमरण उपोषणास पाठिंबा देण्यासाठी व्यापारीही होणार सहभागी
परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
गोरक्षण सेवा संघ महाराष्ट्र राज्य परळी वैजनाथ यांच्यावतीने गेल्या पाच दिवसापासून कत्तलखाना बंद करा, गोहत्या बंद करा यासह अन्य प्रमुख मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. या उपोषणाला सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे. उद्या दि. ८ रोजी परळी शहरात सकल हिंदू समाज एकत्रित होऊन सामुहिकरित्या या उपोषणाला पाठिंबा देणार आहे. या अनुषंगाने परळीतील बाजारपेठ दुपारी बारा वाजेपर्यंत बंद ठेवून व्यापारीही उस्फूर्तपणाने पाठिंबा देणार असल्याची माहिती मिळाली आहे.
गोरक्षण सेवा संघ महाराष्ट्र राज्य परळी वैजनाथ सकल व हिंदूसमाज परळी वैजनाथ यांच्या वतीने गेल्या पाच दिवसांपासून आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे.गौ हत्या बंद झालीच पाहिजे या प्रमुख मागणीसह अन्य सहा मागण्या करिता परळी नगरपरिषद समोर चालू असलेल्या गोरक्षक यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल हिंदू समाज परळी तालुका यांच्या वतीने दिनांक 8.3.2025 रोजी सकाळी 9 वाजता नगरपरिषद कार्यालयासमोर एकत्र येणार आहे.राणी लक्ष्मीबाई टॉवर ते नगरपरिषद कार्यालय पदयात्रेने जावून उपोषणास सामुहिक पाठिंबा देण्यात येणार आहे.
या अनुषंगानेच विविध संस्था, संघटना यांनी जाहीर पाठिंबा व्यक्त करत या पदयात्रेत सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे व्यापारी बांधवांच्या वतीनेही या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी व पदयात्रेत सहभागी होण्यासाठी व्यापार पेठेतील व्यापारी बांधवांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद असुन या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज दि. आठ रोजी दुपारी बारा वाजेपर्यंत परळीची बाजारपेठ बंद ठेवून सर्व व्यापारी वर्ग या पदयात्रेत सहभागी होणार आहे. या पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा