काव्यशलाका: जागतिक महिला दिन विशेष
जागतिक महिला दिन विशेष
----- स्त्रीत्व -----
जबाबदार गृहिणी
शूरवीर रणरागिणी
संघर्षमय कहाणी
तया नाव स्त्रीत्व !
समर्पण भावना
कष्टाची साधना
प्रेमाची आराधना
तया नाव स्त्रीत्व !
सहनशीलतेचा महामेरू
वात्सल्याचा आगरु
कुटुंबासी आधारु
तया नाव स्त्रीत्व !
तरल संवेदना
कोमल भावना
स्वाभिमानी बाणा
तया नाव स्त्रीत्व!
अहोरात्र राबणं
दुसऱ्यांसाठी जगणं
चंदनासम झिजणं
तया नाव स्त्रीत्व!
अश्रू लपवणं
हसत जगणं
आशावादी असणं
तया नाव स्त्रीत्व!
ईश्वराची निर्मीती
सुंदरतेची मूर्ती
आत्मविश्वासाची स्फूर्ती
तया नाव स्त्रीत्व!
विश्वाची जननी
तेजस्वी सौदामिनी
सर्व गुण संपन्न कामिनी
तया नाव स्त्रीत्व!
✍️ वर्षा झानपुरे एकबोटे, पाटोदा. मो.9405490389
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा