पोलीस ठाण्या समोर ऊसतोड मजुराचा आत्मदहनाचा प्रयत्न
केज :- ऊस तोडणीसाठी मजूर देतो असे सांगून ऊसतोड मजूर असलेल्या ट्रॅक्टर मालकाची फसवणूक केल्याने संतप्त ऊसतोड मजुराने केज पोलीस ठाण्या समोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र हा प्रकार लक्षात येताच अत्यंत चपळाईने पोलीसांनी आत्मदहन करणाऱ्या इसमाला ताब्यात घेतले.
या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील जोला येथील पुष्पा मोहन ढाकणे आणि त्यांचे पती मोहन ढाकणे यांच्याकडे ट्रॅक्टर असून ते साखर कारखान्यावर ऊसतोडणी करून कुटुंबाची उपजीविका करीत आहेत. त्यांना दीड कोयते म्हणजे तीन ऊसतोड मजूर देतो असे सांगून बाजीराव ढाकणे रा. जोला ता. केज याने पुष्पा व मोहन ढाकणे यांच्या करून १ लाख ४० हजार रु. घेतले. मात्र त्या बदल्यात त्याने मजूर दिले नसल्याने ढाकणे पती-पत्नीने त्याच्याकडे पैशाची मागणी केली असता त्याने पैसे परत दिले नाहीत. तसेच तुम्ही आत्महत्या केली तरी मी पैसे परत देवू शकत नाही, असे त्यांना म्हणाला. यामुळे आर्थिक फसवणूक आणि त्याच्या मानसिक छळाला कंटाळून दि. २६ मार्च रोजी सकाळी १०:३० वा. च्या सुमारास पुष्पा व मोहन ढाकणे हे दोघे पती-पत्नी हे दोघे मोटार सायकल वरून पोलीस ठाण्याच्या आवारात आले. त्याने ठाण्या जवळ गाडी उभी करून गाडीतील पेट्रोल काढून अंगावर ओतून घेण्याच्या तयारीत असताना आत्मदहन करण्या पूर्वीच पोलीस ठाण्यात हजर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात हा प्रकार येताच पोलीस निरीक्षक वैभव पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चपळाईने धावत जावून झेप घेवून मोहन ढाकणे याला ताब्यात घेत त्याला आत्मदहन करण्या पासून रोखले.
या प्रकारामुळे काही काळ पोलीस ठाण्याच्या परिसरात गोंधळ आणि तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा