श्री. शंकर विद्यालयात जागतिक वन दिनानिमीत्त कार्यक्रम
घाटनांदुर (प्रतिनिधी )
ज्ञान विकास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शंकर विद्यालय घाटनांदुर येथे २१ मार्च जागतिक वन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य व्ही एल गिते तर प्रमुख पाहूणे म्हणून वृक्षमित्र पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ वृक्षप्रेमी सुधाकर देशमुख , वनपरिमंडळ अधिकारी शिंगटे मॅडम , वनरक्षक व्ही एम दौंड, गुट्टे मॅडम, मुंडे तसेच पक्षिमित्र तथा साहित्यीक, कवि नागनाथराव बडे आदिंची व्यासपीठावर उपस्थिती होती . यावेळी सुधाकर देशमुख यांनी या दिनाचे महत्व विषद करून वनसंपदा जतन करण्याचा सल्ला दिला . त्यांनी तालासुरात गायिलेल्या उजाड झाले डोंगर माथे, उजाड झाला गाव, एक तरी झाड लाव माणसा एक तरी झाड लाव या कवितेला उपस्थितांनी भरभरून दाद दिली . प्रास्ताविक शिंगटे मॅडम यांनी केले . यावेळी नाना बडे यांनीही विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले . अध्यक्षीय समारोप प्राचार्य व्ही . एल . गिते सर यांनी केला . सुत्रसंचलन अंकुश माले, परसराम फड यांनी तर आभार गोस्वामी यांनी मानले .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा