पीओपी मूर्ती संदर्भात अभ्यासगट स्थापन - पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

मुंबई, दि. १२:   प्लास्टर ऑफ पॅरिस (POP) मूर्तींमुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी विशेष अभ्यासगट स्थापन केला आहे. तसेच यासंदर्भात राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाची मदत घेण्यात येणार आहे, अशी माहिती पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी आज विधानसभेत दिली.


विधानसभा सदस्य चंद्रकांत नवघरे, वरूण सरदेसाई यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.


मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचे जलस्रोतामध्ये करण्यात येणाऱ्या विसर्जनामुळे  जलप्रदूषणाच्या अनुषंगाने मा. उच्च न्यायालयाच्या निर्देशासनुसार  केंद्रीय प्रदूषण नियंत्रण  मंडळाने पीओपी मूर्ती विसर्जनासंदर्भात नव्याने मार्गदर्शक सूचना जारी करून या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यासंदर्भात सर्व राज्यांना निर्देश दिले होते. त्यानुसार राज्य शासनाने पीओपी मूर्तीं उत्पादन, विक्री आणि विसर्जनास बंदी घातली आहे. 

पीओपी मूर्ती मधील प्रदूषणकारी घटक कमी करणे शक्य होईल का याची पडताळणी करण्यासाठी मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक समिती गठीत करण्यात आली आहे. काही वैज्ञानिक संस्थांचे म्हणणे आहे. पीओपी मूर्तींमुळे प्रदूषण होत नाही राज्य सरकारने यासंदर्भात वैज्ञानिक पुरावे मागवले आहेत.  याचा अभ्यास करण्यासाठी आयोगाकडे विनंती करण्यात आली आहे. अहवाल प्राप्त झाल्यास केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे (CPCB) पाठवले जातील आणि  शास्त्रीय दृष्टिकोनातून  पर्यावरणपूरक आणि पारंपरिकतेला धक्का न लावता सकारात्मक निर्णय घेण्यात येईलअसेही मंत्री पंकजा मुंडे त्यांनी विधानसभेत सांगितले.


0000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार