रोहित शर्माने रचला इतिहास
रोहित शर्माने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये आता इतिहास रचला आहे. आतापर्यंत जी गोष्ट रोहित शर्माला कधीच करता आली नव्हती, ती रोहित शर्माने या सामन्यात करून दाखवली आहे.रोहित शर्मा हा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पुरता अपयशी ठरला आहे, त्याचे पोटपुढे आले आहे, तो फिट नाही, अशी टीका त्याच्यावर होत होती. पण या टीकेला रोहित शर्माने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये चोख उत्तर दिल्याचे पाहायला मिळाले. रोहित शर्माने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये अशी देदिप्यमान कामगिरी केली की, सर्व टीकाकारांची तोंडं त्याने एकाच सामन्यात बंद करून दाखवली.रोहित शर्मा आतापर्यंतच्या चाही सामन्यात धडाकेबाज सुरुवात करत होता, पण त्यानंतर तो लवकर बाद होत होता. रोहित शर्माला या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये लौकिकाला साजेशी खेळी करता आली नव्हती. पण फायनलमध्ये रोहित शर्माने मात्र तुफानी फटकेबाजी करत न्यूझीलंडच्या गोलंदाजांना आपल्यापुढे लोटांगण घालायला भाग पाडले आणि त्याने आपला फॉर्म कसा मोक्याच्या वेळी येऊ शकतो, हे दाखवून दिले. रोहित शर्माने फायनलच्या सामन्यात अशी दणकेबाज सुरुवात केली की, त्याची तोड न्यूझीलंडच्या गोलंदाजांकडे नव्हती. त्यानंतर रोहित शर्माने या चॅम्पियन्स ट्रॉफीत स्पर्धेतील पहिले अर्धशतक झळकावले. पण त्याचबरोबर एक माहिती अशी समोर आली आहे की, रोहित शर्माला यापूर्वी अशी कामगिरी कधीच करता आली नव्हती. आतापर्यंत रोहित शर्मा ज्या आयसीसीच्या फायनलमध्ये खेळला आहे, त्या कोणत्याही फायनल मॅचमध्ये रोहित शर्माला अर्धशतक झळकावता आलेले नव्हते. पण या सामन्यात प्रथमच रोहित शर्माने आयसीसीच्या फायनलमध्ये अर्धशतक झळकावल्याचे पाहायला मिळाले आणि त्याने इतिहास रचला. कारण यापूर्वी अशी कामगिरी रोहितला कधीच करता आली नव्हती, जी रोहितने यावेळी करून दाखवली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा