सारडगाव येथील दत्तधाम गोपाळपुरा येथे प्रवचन; भगवान दत्तात्रेय हे दिशादर्शक : डॉ. तुळशीराम गुट्टे

परळी वैजनाथ:     

    भगवान दत्तात्रेय हे दिशादर्शक असून सर्वांच्या जीवनाचे कल्याण करणारे आहेत असे विचार  संत साहित्याचे अभ्यासक आणि सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज यांनी येथे  आपल्या प्रवचनात मांडले.                    

     तालुक्यातील सारडगाव येथील दत्तधाम गोपाळपुरा (परळी-धर्मापुरी रोड) येथे भंडारा (महाप्रसाद) व प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. फाल्गुन पौर्णिमेच्या निमित्ताने संत साहित्याचे अभ्यासक आणि सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज यांनी प्रवचन करताना या दत्तधामाचे महत्त्व विशद केले. यावेळी परळी  येथील दत्तप्रसाद तोतला , वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक संजय आघाव, सारडगावचे उपसरपंच संदीप तांदळे, पंचायत समितीचे अधिकारी नीलकंठ दराडे आणि वैद्यनाथ बँकेचे अधिकारी विठ्ठल आघाव यांसह अनेक भाविक या प्रसंगी उपस्थित होते. महाप्रसादाचे आयोजन केशव आघाव यांच्या वतीने करण्यात आले दत्तधामाचे महत्त्व डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज यांनी प्रवचन करताना सांगितले की.श्रीक्षेत्र सारडगाव येथील दत्तधाम गोपाळपुरा, परळी -धर्मापुरी रोड वरती हे तीर्थक्षेत्र असून श्रीक्षेत्र दत्तधाम हे बद्रीनाथ ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज 1008 यांनी प्रतीकाशीचा दर्जा दिलेले तीर्थक्षेत्र आहे. भगवान दत्तात्रेय हे दिशादर्शक असून सर्वांच्या जीवनाचे कल्याण करणारे आहेत. या ठिकाणी गोमाता, औदुंबर वृक्ष आणि अखंड धुनी आहे. दत्तात्रेयांचे दर्शन घेण्यापूर्वी या सर्वांचे दर्शन घेणे श्रेयस्कर मानले जाते. हे पवित्र तीर्थक्षेत्र तालुक्यात नावारूपाला येत असून अनेक भक्तांच्या भावना आणि नवस येथे पूर्ण होतात. भगवान दत्तात्रेय हे जीवनात चैतन्य ऊर्जा देणारे दैवत मानले जातात. परळी वैजनाथच्या पूर्वेस साधारणत: नऊ किलोमीटर अंतरावर हे दत्तधाम वसले आहे.असे ही गुट्टे महाराजांनी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !