फुलेनगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीची नवीन कार्यकारिणी जाहीर

अध्यक्षपदी अशोक गवळी,  राहुल पैठणे उपाध्यक्ष, जरीचंद्र मस्के  कोषाध्यकक्ष तर सन्नी देवडे यांची सचिवपदी नियुक्ती


परळी: फुलेनगर, परळी येथे विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती उत्सव समितीची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड सर्वानुमते करण्यात आली.कार्यकारिणी पुढीलप्रमाणे

अशोक गवळी यांची अध्यक्षपदी निवड झाली असून, राहुल पैठणे उपाध्यक्ष म्हणून काम पाहतील. जरीचंद्र मस्के यांच्याकडे कोषाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, तर सन्नी देवडे सचिव म्हणून काम करतील.

या बैठकीला किरण वाघमारे, अजय साळवे, नितीन धाटे, नागोराव मिसाळ, ज्ञानोबा गायकवाड, वैजनाथ सिरसाट, राजाराम व्हावळे, सुराजसिंग जुनीं, सोमनाथ सलगरे, कुशल बागवाले, अमीन शेख, राहुल दांडगे, भास्कर तूपसमुद्रे, सलमान पठाण, दादाराव सिरसाट, बाबासाहेब व्हावळे, संजय भोसले, धम्मा पैठणे, माणिक घोडके, बबन चाहूरकर, ज्ञानोबा राजभोज, आकाश वाघमारे, विशाल सावंत, विजय मस्के यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

नवीन  नियुक्त कार्यकारिणीने विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाचे आयोजन मोठ्या उत्साहात आणि यशस्वीपणे करण्याची ग्वाही दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !