श्रीनिधी देशमुख हिचे एसओएफ आणि आयओएफ ओलिंपियाड परीक्षत घवघवीत यश
परळी वैजनाथ दि.०४ (प्रतिनिधी)
येथील पोद्दार लर्न स्कुल मधील पहिलीची विद्यार्थिनी श्रीनिधी प्रसाद देशमुख हिने SOF आणि आणि IOF ओलिंपियाड या कॉम्पिटेटिव स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश संपादन करीत पाच सुवर्ण, एक रौप्य आणि एका कांस्य पदकासह एकुण सात पदकांची कमाई केली.
त्याच बरोबर इंग्रजी आणि ई.व्ही.एस. या विषयांमध्ये तीने शाळेत प्रथम येण्याचा बहुमान पटकावला. प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या या परीक्षेत विद्यार्थ्यांच्या क्षमता, प्रतिभा, अभिरुची आणि बुद्धिमत्तेची चाचणी घेतली जाते. श्रीनिधी ही कै. लक्ष्मीबाई देशमुख शिक्षण प्रसारक मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक अनिलराव देशमुख यांची नात आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा