अल्पवयीन मुलाचे अपहरण !


केज :-

एका मजूर महिलेच्या १२ वर्षीय मुलाचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची घटना पिसेगाव ता. केज येथे गुरुवारी दि. ६ मार्च रोजी सायंकाळी ६ वा.च्या सुमारास घडली आहे. 

    अकोला जिह्यातील शिवनी येथील कविता राहुल जाधव ही मजूर महिला ही तिची एक मुलगी व दोन मुलांसह पिसेगाव येथे महादेव सूर्यवंशी यांच्या शेतात वास्तव्यास असून तिचे पती गावी आहेत. ही महिला इसाक अब्बास शेख या ठेकेदाराने घेतलेल्या बांधकामावर मजुरीचे काम करते. गुरुवारी कुंबेफळ येथे मिस्त्रीच्या हाताखाली काम करण्यासाठी गेली होती. ती रात्री ७.३० वाजता ती परत घरी आली असता सायंकाळी ६ वा. पासून तिचा सम्यक नावाचा १२ वर्षाचा मुलगा दिसून आला नाही. तिने आजूबाजूला आणि नातेवाईकांकडे विचारपूस केली. मात्र त्याचा शोध न लागल्याने त्याचे अज्ञात व्यक्तीने मुलाचे अपहरण केल्याची तक्रार कविता जाधव यांनी दिल्या वरून अज्ञात व्यक्ती विरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सहाय्यक पोलस निरिक्षक सुरेश बनसोडे हे तपास करीत आहे. दरम्यान, सदर मुलाचा रंग सावळा असून अंगामध्ये चॉकलेटी रंगाचा टि- शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट आहे. त्याच्या गळ्यामध्ये व हातामध्ये पंचरंगी धागा असून या वर्णनाचा मुलगा आढळून आल्यास केज ठाण्याशी संपर्क साधावा. असे आवाहन पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार