बनावट फेरफार रद्द करण्यासाठी नायब तहसीलदारांच्या दालनात महिलेचा अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न !

केज :- नवऱ्या पासून विभक्त राहत असलेल्या महिलेला तिच्या माहेरच्या कडून मिळालेली जमीन तिच्या पतीने परस्पर बनावट दान-पत्रा आधारे दुसऱ्या पत्नीच्या मुलाच्या नावाने केली. तो बनावट फेर रद्द करावा. या मागणीसाठी एक परित्यक्ता महिला अनेक वर्षा पासून तहसील आणि उपविभागीय अधिकारी यांच्याकडे खेटे घालीत आहे. आज त्या प्रकरणी सूनावणी ठेवण्यात आली होती. सुनावणी संपल्या नंतर संतप्त आणि त्रस्त महिलेने नायब तहसीलदार यांच्या दालनात स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र हा प्रकार लक्षात येताच तहसीलच्या कर्मचाऱ्यांनी त्या महिलेला रोखले.


या बाबतची माहिती अशी की १९९० मध्ये दीपा देशमुख यांचा विवाह वरपगाव ता. केज येथील येथील रविंद्र श्रीहरी भोसले यांच्या सोबत झाला होता. विवाहा नंतर त्यांना कोमल नावाची मुलगी झाली. तसेच दिपा भानासुर देशमुख यांची आई रुक्मीण देशमुख यांनी त्यांच्या नावे असलेली जमीन मुलगी दिपा देशमुख हिच्या नावाने केली होती. परंतु काही दिवसा नंतर रवींद्र भोसले याने पहिली पत्नी असताना दुसऱ्या एका महिलेशी लग्न केले. तिच्या पासुन रवींद्र भोसले यास दोन मुली व एक मुलगा जन्माला आला. 

त्यामुळे दिपा देशमुख ही तिची मुलगी कोमल देशमुख हिला घेवून नवरा रवींद्र भोसले यांच्या पासून विभक्त राहत आहे.

त्या दरम्यान रवींद्र भोसले याने पहिली पत्नी दिपा हिच्या नावाने असलेली गट नंबर ५६/१ व गट नंबर ५७/१ मधील ८१ आर जमीन ही रवींद्र भोसले यांनी बनावट दान-पत्रा आधारे आणि तलाठी मंडळ अधिकारी यांच्याशी संगनमत करून एका बाँड आधारे दुसऱ्या पत्नी पासून झालेल्या मुलगा उत्तरेश्र्वर भोसले याच्या नावाने महसुली दस्तावेज करून घेतला.

सदर रवींद्र भोसले यांनी तत्कालीन महसुली अधिकारी यांच्याशी संगनमत करून उत्तरेश्र्वर भोसले यांच्या नावे केलेला फेर रद्द करण्याच्या मागणीसाठी दिपा देशमुख या अनेक दिवसा पासून तहसील कार्यालय आणि उपविभागीय कार्यालयात खेटे घालीत आहेत. 

आज दि. ६ मार्च रोजी सदर फेर रद्द करण्याच्या संदर्भात केज तहसील कार्यालयात सुनावणी झाल्या नंतर दिपा देशमुख यांनी हा फेर रद्द का झाला नाही ? म्हणून नायब तहसीलदार अशोक भंडारे यांच्या दालनामध्ये दुपारी ४:०० वा. च्या सुमारास सोबत एका प्लॅस्टिकच्या बाटलीमध्ये आणलेले पेट्रोल स्वतःच्या अंगावर ओतून घेवून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी तहसील कार्यालयात असलेल्या महिला नायब तहसीलदार आशा वाघ-गायकवाड आणि कर्मचाऱ्यांनी परिस्थीतीचे गांभीर्य ओळखून त्या महिलेला आत्मदहन करण्या पासून रोखले. 

त्या नंतर केज पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वैभव पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे, सहाय्यक महिला पोलीस उपनिरीक्षक सविता निरडे हे घटनास्थळी हजर झाले. त्यांनी दिपा देशमुख या महिलेला आत्मदहन करण्या पासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !