इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

खळबळजनक: आ.संदीप क्षीरसागर यांच्याविरोधात अंजली दमानियांचा नवा दावा 

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर केवळ बीडच नाही, तर संपूर्ण राज्यभरात त्यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा होण्याची मागणी होत आहे. बीडमध्ये अनेक गुन्हेगारीच्या घटना घडल्याचं मागील अनेक दिवसांत समोर आलं आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्याविरोधात अंजली दमानिया यांनी केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे.अंजली दमानिया यांनी नवा दावा केला आहे. बीडमधील एका ख्यातनाम वृत्तपत्राच्या संपादकाने आपल्याला पुराव्यासह काही गोष्टी पाठवल्या आहेत, असा दावा त्यांनी केला आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्याविरोधात काही पुरावे सादर केले आहेत. पण त्यांनी ते पुरावे आपल्याला एका वृत्तपत्राच्या संपादकाने दिल्याचं म्हटलं आहे.अंजली दमानिया यांनी केलेल्या दाव्यात काय म्हटलं?

अंजली दमानिया यांनी केलेल्या दाव्यात म्हटलंय, 'समोर आलेला व्हिडिओ १२ डिसेंबरचा आहे. या व्हिडिओमध्ये सतीश शेळके आणि गणेश भरणारे जय मल्हार बागल यांनी टाटा शोरूम इथे जाऊन येथील मॅनेजरला मारहाण केलेली. हे दोघेजण संदीप क्षीरसागर यांचे पीए आहेत. या व्हिडिओमध्ये असं दिसत आहे, की संदीप क्षीरसागर यांचे पीए स्वतः जाऊन टाटा शोरूममध्ये मारहाण करतात. संदीप क्षीरसागर यांचा पीए सतीश शेळके सुद्धा मारहाण करताना दिसत आहे तसेच हे सर्व मॅनेजर मंडळी परत त्याच्या पाया पडतात'.'संदीप क्षीरसागर वाल्मीक कराडच्या नावाने बोंबा मारतात, दादागिरी करता, असं सांगतात. मात्र स्वतः संदीप क्षीरसागर हेच मोठा गुंड आहे, त्याचे वडीलही गुंडचं होते. व्हिडिओमध्ये जे लोक दिसतात त्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे, हे छोटे वाल्मीक कराड आहेत. सतीश शेळके यांनी काही दिवसापूर्वी बीड येथील बीड ऑफिसमध्ये साहेबाला मारहाण केली होती, मात्र जिल्हा परिषदेच्या सीईओमुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही, ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे.'बीड पंचायत समितीमधील बीडीओ साहेब यांना मारहाण केली. संदीप क्षीरसागर यांनी गुत्तेदार पाठक जे पुणे येथे राहणारे आहेत, त्यांच्याकडून दोन पन्नास- पन्नास लाखाच्या गाड्या घेतल्या आहेत. एक ते स्वतः वापरतात, तर दुसरी यांचा पीए सतीश शेळके वापरतो. बीड येथे जिल्हा उद्योग केंद्राचे २० करोड रुपयांचे काम या पाठक गुत्तेदाराला दिले आहे.'

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!