आखिल भारतीय पेशवा संघटनेच्या धारूर तालुका अध्यक्ष पदी धनंजय कुलकर्णी



अंबाजोगाई (वसुदेव शिंदे):-

आखिल भारतीय पेशवा संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री , सचिन वाडे पाटील यांच्या आदेशानुसार व बीड जिल्ह्यातील संघटनेच्या पदाधिकारी व तालुक्यातील समाज बांधवाच्या व महिला यांच्या प्रमुख उपस्थितीत धनंजय कुलकर्णी यांची धारूर तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. 

आखिल भारतीय पेशवा संघटनेच्या वतीने सर्व राज्यात सर्व ब्राह्माण समाज एकत्रीकरणं करून समाजातील विविध घटकातील परिवाराच्या विविध प्रकारच्या समस्या शिक्षणात येणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणी सर्व समाजाला सोबत घेऊन सामान्य कुटूंबाना वावरताना होणाऱ्या त्रासास योग्य न्याय मिळून देणे असे या संघटनेच्या माध्यमातून विविध कार्य सुरु आहे 

राज्यातील सर्व जिल्ह्यात तालुक्यात या संघटनेच्या पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून समाजासाठी कार्य सुरु आहे त्याच माध्यमातून 

दि . ९मार्च २०२५ रोजी बीड जिल्ह्यातील पदाधिकारी यांनी किल्ले धारूर येथील धनंजय कुलकर्णी यांच्या निवास्थानी बैठक घेऊन त्यांची धारूर तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली 

या वेळी आखिल भारतीय पेशवा संघटनेचे अभय जोशी -बीड जिल्हा उपाध्यक्ष

सुधीर धर्माधिकारी- कार्याध्यक्ष मिलिंद कुलकर्णी - सरचिटणीस संतोष वडगावकर - अंबाजोगाई शहराध्यक्ष व शहरातील प्रतिष्ठित गोपाळ गोरे ,प्रकाश काळे विलास मुळे ,महेश कुलकर्णी ,चंद्रे व महिला वर्ग वेळी मोठया संख्येनं उपस्थितीत होत्या. 

येळी धनंजय कुलकर्णी यांनी तालुका अध्यक्ष पदाचा कार्यभार घेताना व मनोगत व्यक्त करताना दिलेल्या पदाचा समाजाच्या प्रत्येक घटकातील व्यक्तीच्या असणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी व समाजाला एकत्रित आणण्याचे काम पुढे करत राहून इतर समाजाला आपल्या सोबत घेऊन त्यांची मदत घेऊन पुढील काळात सामान्याला न्याय मिळून देण्याचे प्रामाणिक काम करण्याचे आश्वासन दिले व तालुका अध्यक्षपदी निवड केल्या बद्दल सर्वांचे आभार मानले .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार